पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १३७ दाखविण्याकरितां अद्भुत रसाचा पोष करणारे असें कालियमर्दनवर्णन कुलवधूने सुरू केलें ! अपह्नुति. साकी. छेकानुप्रास. ४५. पूर्णचन्द्र आणि वदन; कमलश्री आणि नयन; अमृत आणि सरसहसित; यांचे अभेदरूपानें वर्णन ध्वनित झातें ह्मणून रूपकालंकारध्वनि. छेकानुप्रास. यमक. साकी.. ४६. पल्लव या उपमानपदाचा तिरस्कार पहिल्या चरणात योतित झाला म्हणून प्रतीप. दुसऱ्या चरणांत विधु या उपमानाचा माधुर्यासंबंधाने आननश्री या उपमेयापेक्षा कमीपणा वर्णिला ह्मणून व्यतिरेकालंकार. 'अनुपम ' शब्दानें अनन्वयालंकार, शेवटच्या चरणाने भामिनीचा सौंदर्योत्कर्ष व विर्धाचे भामिनीसारखी स्त्री तयार करण्याचे असामर्थ्य ही द्योतित झाली. मालिनी. छेकानुप्रास. 1.४७. जगद्गुरुपत्नीविषयक रति असल्यामुळे विप्रलंभाभास. मौन धरून बसणे, चावळणे, बावरणे, श्वास घेणे, धैर्य सोडणे, या अनेक क्रियांचा एकसमयावच्छेदानें व्यथाकुलत्व या सामान्यधर्मात अन्वय झाला ह्मणून समुच्चय. यमक. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ४८. शोक आणि हर्ष या क्रिया एकाच वेळी भिन्नधर्मी पर्दे जी 'विरहि लोक ' आणि 'अनंग' त्यांशी अन्वित झाल्या ह्मणून समुच्चय. छेकानुप्रास. दिंडी.. ४९. प्रफुल्ल कमलपंक्तीच्या नामनिर्देशानें तत्सदृश रमणीनयनस्मरण या ठिकाणी व्यंजित झालें. ह्मणून स्मरणालंकारध्वनि. 'हंसति ' यानें कमलालींचे सौभाग्य व्यक्त झालें. साकी. ५०. प्रियवचनश्रवण हा विभाव; दयितानयनकोणगत