पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ महाराष्ट्र भामिनीविलास. ३८. 'मुखसरोज ' यानें लुप्तोपमा. दैन्यलीला वरितील ' यावरून प्रतीपव्यंजना. 'दिग्मंडलें हर्षतील ' याने अतिशयोक्ति. यमक. छेकानुप्रास. वसंततिलक. ३९. विषारी वायु वाहणे, आम्रद्रुमानें नयनसंताप होणे, कोकिलांनी कूजितमिषानें हालाहल विखरणे या पदार्थाचा एकसमयावच्छेदानें प्राणहानिरूप सामान्यधर्माच्या ठिकाणी अन्वय झाला ह्मणून समुच्चय. छेकानुप्रास. यमक. शार्दूलविक्रीडित. ४०. रात्रिसंनिधानाने मानविनाशसिद्धि व्हावयाची इतक्यांत चंद्रोदयाने अनायासेंच कार्य झालें ह्मणून समाधि अलंकार. 'कामातपत्रापरी ' यांतील उपमेनें चंद्रबिंबाचें मानहारकत्व मुचविलें. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ४१. नयनद्वंद्वाचा उत्तरोत्तर उत्कर्ष वर्णिला ह्मणून सारालंकार. छेकानुप्रास. वृत्त्यनुप्रास. शिखरिणी. ४२. 'नित्योल्लासित ' पदाने वदनाचे क्षयिष्णुचंद्रापेक्षा आधिक्य सूचित झाले झणून व्यतिरेकालंकार. नित्योल्लासितत्वाला हेतु अनुरूपप्राणवल्लभसंयोग होय. 'खंजनाक्षवदना ' याने लुप्तोपमा. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ४३. नंदसून हा आलम्बनविभाव, उसासे हा अनुभाव, शून्यवृत्ति हा व्यभिचारिभाव, यांच्या संयोगानें विरहकालीन रति योतित झाली ह्मणून विप्रलंभ शृंगार. साकी. ४४. भगवद्गुणवर्णनाने अनुरागव्यंजक स्वेदरोमांचादि सात्विकभावाची लक्षणे उत्पन्न झाल्याबरोबर ती लक्षणे अनुरागामुळे उत्पन्न झाली नसून आश्चर्यामुळे उत्पन्न झाली आहेत, अस