पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या परिशिष्ट दुसरें. १३५ ह्मणून तुझ्या मुखावर प्रसन्नता नाही. यास्तव पूर्णचंद्र तुला जिंकील ' असा भाव. एरव्ही तुझ्या मुखाचा नेहमी उत्कर्षच आहे हे व्यंग्य. 'अनंग, ' 'आली' व 'जीवितेश' यांचा मनोभंग करून आपल्यालाही हास्यास्पद करून घेणे यांत कांहीं शाहाणपण नाही हे व्यंग्य. यमक, छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ३५. कर्णभूषणाच्या प्रस्तुत वृत्तांतावरून श्रुतिशृंगार, सीत्कार, कांताकरस्पर्श, इत्यादि पदांच्या अर्थसामर्थ्याने अप्रस्तुत नायकवृत्तांताचेंही स्फुरण होतें ह्मणून समासोक्ति, यमक. छेकानुप्रास. शिखरिणी वृत्त. ३६. निशेचे आगमन आणि चंद्राचा उदय ही मानत्यागाची कारणे पूर्णपणे विद्यमान असतां मानत्याग हे कार्य घडले नाही असे मटलें ह्मणून विशेषोक्ति. प्रखररोषानल आणि कोवळ्या कमलनालापेक्षां कोमल तनु यांचा विषम संयोग झाला यामुळे विषमालंकार. 'लाजवि ' या पदानें कोमलत्वासंबंधाने बालमृणाल या उपमानाची तुच्छता दर्शविली ह्मणून प्रतीपालंकार. यमक, छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. मान सोड; नाही तर प्राणान्त होण्याचा प्रसंग येईल हे व्यंग्य. ३७. 'हस्तकमली ठेऊनियां आनन' याच्या ठिकाणी 'कोमलकरी आस्यांबुजा ठेउन, ' असा पाठ वाचावा. कोमलकराचे ठायीं आस्यांबुज ठेवणे, श्वास टाकणे, अत्युष्ण अश्रु ढाळणे, उत्कंठेने प्राणेश्वराकडे डोळे लावणे या विरहिणीच्या स्वाभाविक क्रिया वर्णिल्या ह्मणून स्वभावोक्ति. नायक आलंबनविभाव, श्वास व अश्रुपात हे अनुभाव, विषादचिंतादिक व्यभिचारिभाव यांच्या संयोगाने वियोगकालची रति अभिव्यंजित झाली ह्मणून विप्रलंभ शृंगार. लुप्तोपमा. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित.