पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३४ महाराष्ट्र भामिनीविलास. २७. उपनिषदर्थपरिग्रह आणि गीतावगाहन ही उपरतिकारणे विद्यमान असतां उपरतिरूपकार्य होत नाहीं असें वर्णिले झणून विशेषोक्ति. छेकानुप्रास, यमक. गीति. मनोविषाद व्यंग्य. २८. ताक विकून कवड्या गोळा करावयाच्या हा जो वांछि तार्थ त्याच्या प्राप्तीकरितां खटपट चालली असतां महेन्द्रनीलमण्याचा फार मोठा लाभ झाला असे वर्णन आहे ह्मणून प्रहर्षणालंकार. महेंद्रनीलमणि याने श्रीकृष्ण द्योतित होतो. गीति. छेकानुप्रास. २९. रूपाविषयीं अरुचि नाहीशी करण्याविषयी उपाय योजला पण त्याने उलट सगळ्या जगताविषयीं अरुचि उत्पन्न झाली ह्मणून विषमालंकार. छेकानुप्रास. यमक. गीति. ३०. वदन या उपमेयाचे संबंधाने सुवर्ण या उपमानाचा अधिक्षेप वर्णिला ह्मणून प्रतीपालंकार. छेकानुप्रास. वसंततिलक. ३१. ' वचनें, ' ' गति, ' आणि 'विलास ' या प्रस्तुत क्रियांचा माधुर्यरूप एकधमीशी अन्वय झाला यास्तव तुल्ययोगिता. छेकानुप्रास. दिंडी. ३२. — उपमा नाहीं' यावरून अनन्वय अलंकार. दुसऱ्या अर्धीत हेतूत्प्रेक्षा. साकी. ३३. ' नयनाब्ज' यावरून रूपकालंकार. विकसित शब्दार्ने नयनाब्जांचें लोभनीयत्व व्यंजित झाले. प्ररुतकस्तूरी तिलकाचा अपलाप करून अप्रगत अशा अलीचा त्यावर आरोप केला ह्मणून अपन्हुति अलंकार, गीति. छेकानुप्रास. ३४. 'सांगतों' याच्या ठिकाणी ' सांगते' असे समजावें. कारण ही सखीची नायिकेप्रत उक्ति आहे. 'तूं रुसली आहेस