पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३३ परिशिष्ट दुसरें. अविरोधानें ग्रथित केली ह्मणून समुच्चयालंकार. प्रथमचरणांतील अर्थाला अन्य चरणांतील अर्थ हेतुभूत असल्यामुळे काव्यलिंग, “भुजग ' शब्दानें वायूंचे प्राणहारकत्व व्यंजित झालें. छेकानुप्रास. मालिनी वृत्त. २२. दुसऱ्या दोन चरणांमध्ये नायिकेचा लज्जारूपव्यभिचारिभाव द्योतित झाला. उपजाति वृत्त. छेकानुप्रास. २३. दिक्तमोहरणक्रियेने आणि तप्तजनशमनानें चंद्रापेक्षा वदनाचे आधिक्य प्रतीत झालें यास्तव व्यतिरेकध्वनि. शेवटच्या चरणानें कमल या उपमानाचा आधिक्षेप वर्णिला ह्मणून प्रतीपालंकार. द्रुतविलंबित वृत्त. छेकानुप्रास.. २४. कोमलत्वानें गंड लवलीवल्लीला लाज आणतो याने वरच्याप्रमाणे प्रतीपालंकार. शेवटच्या दोन चरणांनी कोमलत्व, शुभ्रत्त्व, प्रफुल्लितत्व इत्यादि गंडगतगुणांचा उत्कर्ष वर्णित झाला. छेकानुप्रास. दिंडी. २५. मोह आणि लज्जा यांनी अनुक्रमें नयनाब्जश्रीचा उल्लास व संकोच झाला यास्तव यथासंख्य अलंकार. भगवान् दाशरथी रामचंद्र याच्या लोकोत्तरयौवनोद्माचें; आणि शील, शौर्य, बल आणि कांति यांचे दर्शन हा विभाव; नयनगत संकोचविकास हा अनुभाव; लज्जा आणि उत्सुकता यांचा संधि व्यंग्य आहे. छेकानुप्रास. साकी वृत्त. रूपकालंकारही. २६. 'ईशचाप ' आणि 'मिथिलानायकनंदिनी ' या हेतुगर्भविशेष्यपदसामर्थ्याने परिकरांकुर. मुखाने झणजे निर्विघ्नपणे. मिथिलेतील जनांची सीतारामचंद्रसंयोगविषयक चिंता व्यंग्य आहे. छेकानुप्रास. औपच्छंदसिक वृत्त.