पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३२ महाराष्ट्र भामिनीविलास. १३. पहिल्या दोन चरणांनी नायकविषयक औत्सुक्य प्रतीत झाले. विकास शब्दानें हर्ष स्फुटित झाला. मालभारिणी वृत्त. १४. पुष्पिताग्रा वृत्त. रत्यभिलाष हे व्यंग्य. का १५. अपराधरूप कारणाचा अभाव असतां नेत्र रक्त होणे हे कार्य झालें यास्तव विभावना. प्रणामरूप कारण असून हर्षरूप कार्याची उत्पत्ति नाही ह्मणून विशेषोक्ति. प्रयाणाचा व जीवितहानीचा संबंध नसताही तो वर्णिला ह्मणून अतिशयोक्ति. औपच्छंदसिक वृत्त. १६. साकी. विप्रलंभशृंगार. छेकानुप्रास. १७. सरोजधर्म तरुणीमुखांत असल्यामुळे तरुणीमुखासंबंधाने अलिकिशोरकसंघाला सरोजभ्रान्ति झाली ह्मणून भ्रान्तिमान् अलंकार. दोन समानधर्मि वस्तु पुढे आहेत. एक तीरावर व दुसरी नारामध्ये. तेव्हां तीरस्थित वस्तु कमल होय किंवा नीरस्थित वस्तु कमल होय असा संशय अलिकिशोरक. संघाला उत्पन्न झाला ह्मणून ससंदेह अलंकार. 'किशोरक ' या शब्दाने अलींची अपरिपक्क बुद्धि व्यक्त झाली. छेकानुप्रास. वसंततिलक वृत्त. १८. सवतमत्सर हे व्यंग्य. छेकानुप्रास. साकी. १९. विरहाचा असह्यपणा हे व्यंग्य. छेकानुप्रास. औपच्छंदसिक वृत्त. २०. तिसऱ्या चरणांत मुग्धांगनेचा स्वाभाविक विलास वर्णिला ह्मणून स्वभावोक्ति. छेकानुप्रास. दिंडी. विप्रलंभशृंगार. २१. मलयभुजगवायूंचे वाहणे आणि मधुकरांचे मंजुल गाणे ही दोन्ही कारणे विरहिणीजीवितनाशाविषयी एकाच काली