पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १३१ ३. छेकानुप्रास. विप्रलंभ शृंगार. वसंततिलक वृत्त. ४. यांत नायिकेच्या मुखाचें प्रसन्नचंद्राशी अभेदरूपानें वर्णन ध्वनित झालें ह्मणून रूपकध्वनि. वसंततिलक. ५. नायिकेचे स्वाभाविक विलास वर्णन केले यास्तव स्वभावोक्ति. विप्रलंभशृंगार. छेकानुप्रास. साकी. ६. छेकानुप्रास. साकी, पतिप्रेम हे व्यंग्य. ७. नायकाकडे पाहण्याविषयी उत्सुकता व त्याकडे पहात असतां वडील माणसें पाहतील की काय ही भीति; ह्मणून ईषत्फुल्लाब्जसाम्य कल्पिलें. उपमा. दिंडी. ८. श्लेषमूलक उत्प्रेक्षा. छेकानुप्रास. साकी. ९. विजेच्या क्षणिक तेजावरून नायिकेचें पलायन सूचित झाले. नायकविषयक लज्जा हे व्यंग्य. छेकानुप्रास. उपजाति वृत्त. १०. लटिका कोप दावणे हे कारण आणि लोचनांला कंप येऊन ती अश्रुपरिप्लत होणे हे कार्य एकसमयावच्छेदानें कल्पिलें ह्मणन अतिशयोक्ति. पहिल्या चरणानें प्रणयप्रकुपित नायकाची स्वाभाविक कृति वर्णिली यास्तव स्वभावोक्ति. ' अन्यधामी, यांत कोपातिशय व्यंजित झाला. ' मी जाऊ नये ह्मणून किती प्रकारांनी तरी नायिकेने माझी प्रार्थना केली ! ' असा शेवटल्या चरणाचा भाव. छेकानुप्रास आणि वृत्यनुप्रास. वसंततिलक. ११. वृत्यनुप्रास. साकी. तरुणीकटाक्ष अत्यंत मनःक्षोभ करणारा आहे हे व्यंग्य. १२. उपमा, प्रेमातिरेक व्यंग्य. छेकानुप्रास. रथोद्धता वृत्त.