पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० महाराष्ट्र भामिनीविलास. वर्णिलें इत्यादिकानें विभावनालंकार. 'अंगारापरि' याने उपमालंकारही. यमक. छेकानुप्रास. साकी. १००. 'वाटोनी' पदाने गजराजविषयक भ्रान्ति स्फुट झाली ह्मणून भ्रान्तिमदलंकार, वीर्यशालित्व हे कारण असूनही कवलरूप कार्याचा अभाव वर्णिला ह्मणून विशेषोक्ति. यमक. छेकानुप्रास. प्रहर्षिणी वृत्त. १०१. यांत गर्जितानें करिशब्दभ्रान्ति ध्वनित झाली यास्तव भ्रान्तिमान् अलंकार व्यंजित झाला. ' राज्यर्धजात' पदानें हििशशूचा नैसर्गिक प्रतापातिशय सुचविला. उड्डानार्थ स्वांगाकर्षण ही हरिशिशूची स्वाभाविकक्रिया वर्णित झाली; म्हणून स्वभावोक्ति. छेकानुप्रास. गीतिच्छंद. ( शृंगारविलास. ) find १. राहरोषशंका, कलंक आणि पाण्डुरता यांच्या अभावाने वदनाचें चंद्रापेक्षां आधिक्य ध्वनित झाले; यास्तव व्यतिरेकध्वनि. राहुरोपशंकादिकांचा अभाव वदनद्युतिप्रकाशनरूप कार्याला हेतुभूत आहे ह्मणून कायलिंग. 'सतत प्रकाशे ' या पदांनी वदनयुतीचा उत्कर्ष स्पष्ट झाला. ' तीस साम्य न भासे' एणेकरून अनन्वयालंकार झाला. राहु चंद्राला ग्रासतो हे प्रसिद्ध आहे. भामिनीनामक पंडितरायांची स्त्री. चिंता कांतिक्षयकारिणी आहे आणि चिंताभाव कांतिवर्धनकर आहे हे व्यंग्य. छेकानुप्रास. पुष्पिताग्रा वृत्त. शृंगार रस. २. ' अब्जमाला, ' ' बिसतति ' आणि 'पल्लव ' यांच्यापेक्षा अंगकांचे मार्दव अधिक आहे असें वर्णिले ह्मणून व्यतिरेक. छेकानुप्रास. पुष्पिताग्रा वृत्त.