पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. ९२. यांत वस्तूंचा उत्तरोत्तर उत्कर्ष वर्णित झाला, यास्तव सारालंकार. गीतिच्छंद. ९३. यांत शेवटल्या उपमेयवाक्यार्थाचें पूर्वीच्या तीन उपमानवाक्यार्थीशी ‘जो' आणि अध्याहृत 'तो' या पदांनी ऐक्य आरोपित केलें ह्मणून निदर्शनालंकार. गीतिच्छंद. ९४. यांत वानराच्या स्वाभाविक चेष्टांचे वर्णन झाले ह्मणून स्वभावोक्ति. अनभिज्ञाला सुंदर वस्तु दिली तर तिचा नाश होतो हे व्यंग्य. साकी वृत्त. ९५. सौंदर्यादि विलोभन नसतां प्रेम आणि प्रेमाचा अभाव नसतां त्याग असा कारणाभाव असून कार्योत्पत्ति झाल्यामुळे विभावनालंकार. हा श्लेषमूलक आहे हे उघड आहे. गांतिच्छंद. ९६. ' स्वोदरार्थ; ' आणि 'परार्थ'; तसेंच 'मुखास ' आणि 'समग्र तनु ' यांतील विरोधाने लोकार्थाला सौंदर्य आले आहे. पहिल्या अडीच चरणांतील अर्थाचे पुढल्या दीड चरणांतील अर्थाने समर्थन झाले ह्मणून काव्यलिंग. छेकानुप्रास. वसंततिलक वृत्त. ९७. कुलाने, संगतीने किंवा जातीने महत्त्व येत नाही. तें येण्याला स्वताच्या अंगी तसे गुणच पाहिजेत हे व्यंग्य. छेकानप्रास. गीति. ९८. अत्यंत सुंदर पदार्थांवर कली एकसारखा पोसतो आहे या वस्तूने तुला जर मरायचे असेल तर तूं स्वात्मालंकरणादि गुणप्राप्तीच्या नादी लाग ही वस्तु व्यंजित झाली. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. ९९, कमलांच्या प्रफुल्लतेचा अभाव नसून दिशांचे धूसरत्व