पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ महाराष्ट्र भामिनीविलास. ८४. 'परयाचनचिंताग्नि ' याने रूपकालंकार. याचनेचा प्रसंग न येणे हीच परमभाग्याची सीमा हे व्यंग्य. छेकानुप्रास. गीतिच्छंद. ८५. श्लेषमूलक पूर्णोपमालंकार. यमक, छेकानुप्रास. गीतिच्छंद. ८६. यांत 'रक्षण' आणि 'शमन ' हे शब्द विरोधिलक्षणेनें विपरीतार्थबोधक आहेत. रूपकालंकार. नीचवर्णन अशक्य हे व्यंग्य. छेकानुप्रास. गातिच्छंद. 'एकटा ' याने अनलाचा अनन्यसाधारण उत्कर्ष ध्वनित झाला.. ८७. श्लेषमूलक पूर्णोपमा. छेकानप्रास. गीतिच्छंद. ८८. रूपकालंकार. लशुन जसा सुगंधाची हानि करणारा तसा खलही सत्कीर्तीची हानि करणारा आहे; जसा अनलाचे ठिकाणी हिमाचा अभाव तसाच शांतीचाही खलाच्या ठिकाणी अभाव; पुष्पाचा जसा आकाशांत सर्वथा असंभव तत्ताच दयेचाही खलाच्या ठिकाणी सर्वथा असंभव. गीतिच्छंद. ८९. तिसऱ्या चरणाने उपकाराची परमावधि सुचविली. — उदारतिलका ' या हेतुगर्भ विशेषणाने परिकर अलंकार. वसंततिलक वृत्त. ९० 'दुर्जनासि वश कराया इच्छितसें' या उपमेयवाक्यार्थाचें आणि पहिल्या तीन चरणांतील तीन उपमानवाक्यार्थीचें ऐक्य ‘जो' व अध्याहृत 'तो' यांनी आरोपित केले आहे ह्मणून निदर्शनालंकार. दुर्जनवशीकरणाचा प्रयत्न हानिकारक आहे हे व्यंग्य. छेकानुप्रास, यमक. वसंततिलक वृत्त. ९१. पुरुष उच्चपदाला पोहोंचला ह्मणजे सारासारविचारशून्य होतो हे व्यंग्य. छेकानुप्रास. प्रहर्षिणी वृत्त.