पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १२५ ६७. लोकोपकारमतिला उपमान नसल्यामुळे अनन्वयालंकार. 'काही विलक्षणाच ' इ. चरणाने भेदकातिशयोक्ति. छेकानुप्रास आणि यमक. वसंततिलक. अद्भुत रस. ६८. यांत पूर्वार्धस्थ उपमेयवाक्यांतील व उत्तरार्धस्थ उपमानवाक्यांतील समानधर्म एक असून तो औदार्यवैभवदर्शन व लोकोत्तरगंधप्रकटन अशा वेगळ्या रीतीने सांगण्यांत आला ह्मणून प्रतिवस्तूपमालंकार. पूर्वार्धातील सामान्य अर्थाचें उत्तरार्धातील विशेष अर्थाने समर्थन झाले ह्मणून अथीन्तरन्यास. अद्भुत रस. वसंततिलक वृत्त. ६९. वरील श्लोकांतल्याप्रमाणे प्रतिवस्तूपमा आणि अर्थान्तरन्यास. दिंडी. ७०. पूर्वार्धातील प्रकत अर्थाने उत्तरार्धातील अप्ररुत अर्थाचें ग्रहण झालें यास्तव अर्थापत्ति अलंकार. 'श्या, ' 'बालपक्षी, ' आणि 'शश' ही पदें क्रमाने ' हरि, ' 'नाग' आणि 'वारण ' यांच्याशी अन्वित होतात ह्मणून यथासंख्य अलंकार. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. ७१. यांत वैधान प्रतिवस्तूपमा अलंकार झाला. पहिल्या अर्धीतील सामान्य अर्थीचे दुसऱ्या अर्धातील विशेष अर्थाने समर्थन झाले ह्मणून अर्थान्तरन्यास. छेकानुप्रास. प्रहर्षिणी वृत्त. कष्ट सोसल्याशिवाय मोठेपणा येत नाही हे व्यंग्य. ७२. यांत सेवन, धारण, वरण आणि पालन या भिन्नवाक्यगत धर्माची वस्तुतः एकरूपता असल्यामुळे मालाप्रतिवस्तूपमा अलंकार झाला. येथे शेवटच्या वाक्यांत प्रस्तुत पदार्थाचे उपादान आहे व बाकीच्यांत अप्रस्तुताचे आहे असें धरले पाहिजे. सगळेच