पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२६ महाराष्ट्र भामिनीविलास. पदार्थ प्रस्तुत किंवा अप्रस्तुत अशी कल्पना केली तर आवृत्तिदीपक अलंकार होईल. जगांत कोणी निर्दोष नाही हे व्यंग्य. छे कानुप्रास, यमक. औपच्छंदासक वृत्त. ७३. प्रथमार्धगत उपमेयवाक्यांतील व द्वितीयागत उपमानवाक्यांतील समानधर्म जे उपरुति व प्रफुल्लीकरण त्यांचे येथे बिंबप्रतिबिंबरूपानें कथन झाल्यामुळे दृष्टान्तालंकार. वृत्यनुप्रास. वसंततिलक. ७४. या पद्यांत विभूतींचे माहात्म्य हा प्रस्तुत लौकिक अर्थ प्रतिपादित झाला. त्याच्या बरोबरच परमार्थव्यासंग, जहस्वार्थ, आणि अभेदैकत्व या अप्रस्तुत शास्त्रीय अर्थांचा साधारण विशेषणसामर्थ्याने थोडक्यांत भास झाला यास्तव समासोक्ति. छेकानुप्रास. शिखरिणी वृत्त. ७५. वैधप्रतिपादित प्रतिवस्तूपमा आणि श्लेष हे अलंकार. यमक. गीतिच्छंद. ७६. पूर्णोपमा अलंकार. गीतिच्छंद. ७७. प्रथमार्धातील सामान्य अर्थाचें द्वितीयार्धातील विशेष अर्थाने समर्थन झाले ह्मणून अर्थान्तरन्यास. रुग्णावस्थेचा अथवा संसारसागराचा पार देणारा ह्मणजे दाखविणारा ह्मणून पारद. श्लेषालंकार. गीतिच्छंद. ७८. शशशिशु बघोनी डचकली' याने सीतेचे परमभीरुत्व व्यंजित झाले. 'दशवदन' या हेतुगर्भ विशेष्यपदाने परिकरांकुर. ' दशवदन' याने रावणाचे विकराल स्वरूप प्रतीत झाले. अत्यंत भीरु, कोमलांगी, राजकुमारी, पातब्रता, अशी जानकी, राक्षसपति, दशतुंड, क्रूरकर्मा अशा रावणाच्या