पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ महाराष्ट्र भामिनीविलास. काम व कविवाणी यांचे सर्वस्व असें झटले आहे. 'मधुप' शब्दानें श्लेषालंकार होऊन अंभोरुहाची निंदा व्यंजित झाली. ‘मोठा चमत्कार हा ' याने अंभोरुहाचा उपहास परिस्फुटित झाला. बहुगुणसंपन्नाची व्यसनासक्ति अत्यंत गर्य होय हे व्यंग्य छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. ६२. 'लीलेने ' व 'मुखभराने या पदांनी 'गजवरा 'चा अविवेक ध्वनित केला. काव्यलिंग व रूपक हे अलंकार. छेकानुप्रास. गीतिच्छन्द. ६३. थोर लोकांच्या वाणीला विफलता कधी येत नाही असा भाव. पूर्णोपमालंकार. साकी वृत्त. ६४. पात्रापात्रविचाराविणे गुणांची अपूर्णता या अर्थी विनोक्ति व्यंजित झाली; पात्रापात्रविचार असता तर गुणपूर्णता असती याअर्थी संभावना अलंकार. छेकानुप्रास. यमक. शार्दूलविक्रीडित वृत्त. ६५. पापवासनेने पुण्यक्षेत्रांत व नृपालभवनांत संचार करणारे लोक प्रस्तुतकालांतही आहेत. पंडितांना दिल्लीदरबारांत आणि वाराणसी व मथुरा या क्षेत्रांत त्यांचा अनुभव आला असें या पद्यावरून दिसते. ' त्वत्तुल्य' इत्यादिकावरून उपमा. 'त्वत्तुल्य खलवृन्द' या अन्य उपमेयाचा लाभ होऊन प्ररुत उपमेय जें व्याध त्याचा अनादर झाला यास्तव प्रतीप अलंकार झाला. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. जा ६६. ' मृदुवचनी वश करुनी ' यावरून खलांचें स्वकर्मनेपुण्य प्रतीत झाले. 'काश्यपि ' पदानें विवेकार्हत्व सूचित झाले. छेकानुप्रास. खलांना आश्रय देणे हे थोरांना योग्य नव्हे हे व्यंग्य. गीतिच्छंद.