पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२३ परिशिष्ट दुसरें. स्वैरविहारादि इष्टार्थव्यापारापासून इष्टप्राप्ति न होतां उलट सर्पागमनरूप अनिष्ट प्राप्त झाले ह्मणून विषमालंकार. शार्दूलविक्रीडित वृत्त. ५७. प्रथमार्धातील अर्थास द्वितीचार्धातील अर्थ हेतुभूत असल्यामुळे काव्यलिंग अलंकार. तिसऱ्या व चवथ्या चरणांनी । तटिनी ' चे दुरवगाह्यत्व सूचित केले. मोठ्यांनाही जे टुष्कर कार्य तें शुद्रांनी हाती घेणे अनुचित होय हे व्यंग्य. 'ऐसें जनीं बोलती' हें पादपूरणार्थ आहे. 'उपलसा' यावरून उपमालंकार, शार्दूलविक्रीडित वृत्त. ॥ ५८. 'नव्हे हा उन्मत्त द्विप' यावरून कोपाचे कारण द्विपभ्रान्ति हे सूचित झाले व त्यामुळे भ्रान्तिमदलंकार व्यंजित झाला. 'प्रबलहरिवाळा' या पदानें उन्मत्त द्विपहननसामर्थ्य ध्वनित झालें. वीर रस. वरील लोकांतल्याप्रमाणे काव्यालिंग. शिखरिणी वृत्त. ५९. काव्यलिंग. एक मासाच्या गांच्या ठायीं स्फुरणाचा संबंध नसतां तेथें तो कल्पिला ह्मणून अतिशयोक्ति. ' मत्तकरिभ्रान्तीने' या पदानें भ्रान्तिमदलेकार. छेकानुप्रास व यमक. गीति छंद. ६०. पूर्वार्धानें हरिपराक्रम सूचित झाला. बलिष्ठानें दुबलापुढे आपले शौर्य मिरविणे अनुचित हे व्यंग्य. छेकानुप्रास. यमक. गीतिच्छंद. ६१. अम्भोरुहावर काम व कविवाणी यांच्या सर्वस्वाचा आरोप झाल्यामुळे रूपकालंकार. अंभोरुहाचे दर्शन प्रेमोत्पादक असल्यामळे व ते स्वतः उपमानस्थानी प्रतिष्ठित झाल्यामळे तें