पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ महाराष्ट्र भामिनीविलास. ५३ पहिल्या दोन चरणांनी राघवाचा वार्यशालीपणा स्पष्ट झाला. 'कोठे हा विहरेल ' यावरून राघवाची विपन्नदशा ध्वनित झाली. केलिकलहरूप कारण आणि अर्णवत्यागरूप कार्य ही एकसमयावच्छेदाने घडून आली, ह्मणून अक्रमातिशयोक्ति अलंकार झाला. अद्भुतरस. छेकानुप्रास. यमक. शार्दूलविक्रीडित वृत्त. ५४. 'जाळिलें । याबद्दल 'शोषिलें असें पद कल्पिलें तर अथीला अधिक अनुगण होईल. 'जाळिलें । हे पद कायम ठेविलें तर लक्षणेनें शोषन टाकले किंवा नीरस करून टाकलें, असा त्याचा अर्थ घेतला पाहिजे. तिस-या चरणानें परिमलाचे अलौकिकत्व सूचित झाले. 'ललिता' या पदानें लवंगलतिकेचे रक्षणाहत्व ध्वनित झाले. 'लतिका पदाने मादवाधिक्य व्यंजित झाले. लवंगलतिका आणि दावानल यांतील वैषम्यामुळे विषमालंकार. छेकानुप्रास. यमक. करुणरस. शार्दूलविक्रीडित वृत्त. परकीय पतिव्रता स्त्रीशी धृष्टपणा करणे अत्यंत अनुचित होय, हे व्यंग्य. ५५. 'स्वर्गालंहति । 'अमरदूंचे विहारस्थल ' 'पुण्यावलींचे फल ' यांचा नंदनवनावर आरोप केल्यामुळे सूपकालंकार. खाण्डव हे कुरुक्षेत्रामधील एक इन्द्राचे आवडतें अरण्य होते. अग्नीने रुष्ण व अर्जुन यांच्या साहाय्याने ते जाळून टाकिलें, अशी पौराणिक कथा आहे. 'खाण्डवरंगभूमिनट' ह्मणजे अर्थात् अनि. 'नट' शब्दाने खाण्डवाला लीलेने जाळण्याचे अग्नीचे सामर्थ्य सूचित झाले. 'खाण्डवरङ्गभूमि' येथें रूपकालंकार. भयानक व रौद्र रस. शार्दूलविक्रीडित वृत्त. ५६. पहिल्या दोन चरणांतील कल्पना हेच मांडे, असें झटले त्यामुळे रूपकालंकार. 'हस्तिशुंडेपरी' इत्यादिकाने पूर्णोपमा.