पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १२१ ५० ' गजेन्द्रा ' या पदाने साधारण गजाविषयीं तर बोलायलाच नको, असा भाव सूचित झाला. 'निविड वन ' या पदांवरून संकटसंभव ध्वनित झाला. 'मदान्धा ' पदानें गजेन्द्राचा अविवेक प्रस्फुटित झाला. 'करी मानोनीयां' यावरून करिविषयक भ्रांति व्यक्त झाल्यामुळे भ्रान्तिमदलंकार झाला. ' शिलासंघा प्रखरनखरी खंडित करी ' याने मृगपतीचा शौर्यातिरेक द्योतित झाला. 'निजे ' या पदाने मृगपति उठण्याचा मात्र अवकाश आहे; उठला ह्मणजे तूं मेलासच समज, असें व्यंग्य प्रतीत झाले. पहिल्या अर्धातील वाक्यार्थाला दुसऱ्या अर्धातील वाक्यार्थ हेतुभूत झाला ह्मणून काव्यलिंग. छेकानुप्रास आणि यमक. शिखरिणी वृत्त. ५१. 'गजराजबाळ । 'हरिचा बाल ' 'करिणी ' या साभिप्राय विशेष्यपदसामर्थ्याने परिकरांकुर अलंकार झाला. वरच्या श्लोकांतल्याप्रमाणे काव्यलिंग. 'स्तनपायि' या हेतुगर्भ विशेषणामुळे परिकर अलंकार. 'करिणीच राहतिल' यांत स्त्रीमारण हे निषिद्ध आहे ह्मणून त्या मात्र राहतील, असा भाव. पुरुष सगळे ठार होतील, हे व्यंग्य. वृत्त्यनुप्रास. मंजुभाषिणी वृत्त. ५२. 'चतुर ' या पदाने माळ्याचे झाडे सरासरी लावण्यापरतेंच चातुर्य समजावयाचे. अधिक अर्थ घेतल्यास रसव्याघात होईल. 'कोठे तरि' यावरून बकुलाची किंमत माळ्याला समजली नाही, हा अर्थ व्यंजित झाला. ' असें कोणा ठावें । इत्यादिकांने असंभवनामा अलंकार झाला. 'कोणान्तरिं' या पदानें प्रतिष्ठासामग्रीचा अभाव सूचित झाला. शेवटच्या चरणावरून बकुलाचा लोकोत्तर गुण प्रकट झाला. अद्भुत रस. छेकानुप्रास, शिखरिणी वृत्त.