पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० महाराष्ट्र भामिनीविलास. ध्वनित झाले. दैवयोगाने काही वेळपर्यंत थोडेसें ऐश्वर्य प्राप्त झाले तर थोराशी स्पर्धा करणे योग्य नव्हे, हे व्यंग्य. 'तिच्या । ४४. पहिल्या दोन चरणांनी मधुव्रताचा उत्कर्ष द्योतित झाला. पूज्यत्व हे कारण असूनही आदर हे कार्य झाले नाही; ह्मणून विशेषोक्ति. शार्दूलविक्रीडित वृत्त. .४५. छेकानुप्रास, वसंततिलक वृत्त. ४६. पहिल्या चरणानें रसालाची पूर्वीची संपन्न स्थिति व्यक्त अलंकार व्यक्त झाले. 'षट्पदा' या पदानें भ्रमराचे 'अधमत्व' ध्वनित झाले. ज्याने संपन्नदशेत आपणास साहाय्य केलें तो दुर्दैवाने विपन्न झाला तर त्यास आपण सोडूं नये हे व्यंग्य. छेकानुप्रास. शार्दूलविक्राडित वृत्त. ४७. 'करिमौक्तिकांचा वर्षाव ' या पदांनी मृगराजाचा शौर्यातिरेक व्यंजित झाला. 'मृगराज' पदाने मृगचक्रवर्तित्व सुचविलें. परिकरांकर अलंकार. वीर रस. छेकानुप्रास; यमक. वसंततिलक वृत्त. येथे राहिल्यास घात होईल हे व्यंग्य. ४८. 'करिरिपनें' या साभिप्राय विशेष्यपदसामर्थ्याने परिकरांकुर अलंकार झाला. छेकानुप्रास. गीतिच्छंद. समर्थानें विपत्कालीही दुर्बलावर शस्त्र धरूं नये, हे व्यंग्य. ४९, पहिल्या दोन चरणांनी हरीचा पराक्रमातिशय स्फुटित झाला. 'बापुडे ' याच्या ठिकाणी ' साकडे ' असा पाठ कल्पिला झणजे रसहानि होत नाही. रथोद्धता छंद.