पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. ११९ प्रकारानी उत्तमत्व प्रतीत झाले. 'द्विजोत्तंस हंस' यांनी श्लेष व्यक्त झाला. परिकरालंकार. छेकानुप्रास. शिखरिणी वृत्त. शांत रस. ३९. ग्रावांबरोबर सन्मणींचा आणि मीनादिकांबरोबर भगवान् विष्णूचा चमत्कारिक सहभाव येथें कल्पिला आहे ह्मणून सहोक्तयलंकार. 'सूर्यबिंबरुचिर' आणि ' भगवान् ' या हेतुगर्भ विशेषणपदांनी परिकरालंकार. निन्दा आणि स्तवन यांपैकी काय करूं हा संशय, ह्मणून संदेहालंकार. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त, ४०. 'जलदतुल्य ' या उपमेमध्ये महत्व आणि नीलत्व हा सामान्यधर्म समजावा. 'जलद' या हेतुगर्भ विशेष्यपदानें परिकरांकरालंकार. 'जलहि' यांतील 'हि' या शब्दानें जलाचे तुच्छत्व आणि ह्मणूनच प्रथमदानयोग्यत्व सूचित झाले. छेकावृत्यनुप्रास. गीतिच्छंद. ४१. विपुलजललक्ष्मीरूप कारण असून तृषितदयारूप कार्य घडत नाही ह्मणून विशेषोक्ति अलंकार झाला. 'कशाङ्गा ' या हेतुगर्भ विशेषणपदाने परिकर अलंकार. साधनसंपत्ति असतां दान करणे योग्य. ती नाहीशी झाल्यावर दान करण्याचे सामर्थ्य राहात नाही, हे व्यंग्य. वृत्त शिखरिणी. छेकानुप्रास. ४२. ' वदतों ' याबद्दल सांगें' असा पाठ वाचावा ह्मणजे छन्दोभंगपरिहार होईल. 'याचक ' व ' उदारा ' या विशेषणपदसामर्थ्याने परिकरालंकार. 'त्यांहि न सोडिशी' याने सिंधूची अनुचितकार्यप्रवृत्ति दर्शविली. छेकानुप्रास. मालभारिणी वृत्त. ४३. ' भागीरथी' पदानें गंगेचें जगत्पावनत्व प्रतीत झाले. 'वर्षानदि ' यांतील वर्षा शब्दाने नदीचे नूतन व भंगुर ऐश्वर्य