पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११८ महाराष्ट्र भामिनीविलास. केलें. तिसऱ्या चरणाने अंबुवाहाची अनुचितकर्मप्रवृत्ति स्फुटित झाली. संपत्तीच्या धुंदीनें सारासारविचार लुप्त होतो हे व्यंग्य. छेकानुप्रास. मालिनी वृत्त. करुण रस, ३५. ' हा ' ह्मणजे प्रत्यक्ष ऐकू येणारा. 'पथिका ' आणि 'अंबुद ' या हेतुगर्भ विशेष्यपदांनी परिकरांकुर अलंकार. — भीति ' ह्मणजे अर्थात् वाटेंत मुक्काम होऊन प्रियेच्या विरहाची मर्यादा वाढण्याची. तिसऱ्या चरणावरून अंबुदाचे परमौदार्य व निःसीमकारुणिकता ही व्यंजित झाली, जीवन ' याने लेष व्यक्त झाला. ' भीति मनांत आणू नको, ' इत्यादि वाक्यार्थाला ' हा विश्वतापहारक अंबुद आहे ' इत्यादि वाक्यार्थ हेतुभूत झाला; यास्तव काव्यलिंग अलंकार झाला. भयानक आणि शान्त रस. वसन्ततिलक वृत्त. यमक व छेकानुप्रास हे शब्दालंकार. ३६. श्रीखण्डा ' या पदानें चंदनाचे स्वभावसुंदरत्व ध्वनित झाले. 'सुंदर' शब्दानें गुणराशीचे संरक्षणीयत्व सूचित झाले. ' नाशी' याच्या ठिकाणी ' भक्षी' असा पाठ कल्पिल्यास मळांतील अर्थाशी अधिक जुळेल. 'द्विजिव्ह ' शब्दानें श्लेषालंकार झाला. एका मोठ्या दोषाने सर्व गुणांची माती होते हैं व्यंग्य. छेकानुप्रास आणि यमक. करुण रस. शार्दूलविक्रीडित वृत्त. ३७. पहिल्या तिन्ही चरणांनी घनाचे निरपेक्ष लोकतापनिवारकत्व स्पष्ट झाले. ' उन्नत ' या हेतुगर्भ विशेषणानें परिकरालंकार झाला. वृत्त दिंडी. ३८. 'वसति ' याच्याबद्दल ' रुचिर' हे पद घातले तर मुळाशी अधिक जुळते. पहिल्या दोन चरणांनी पद्माचे अनेक