पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११७ परिशिष्ट दुसरें. करणा-या तोयदाचा लाभ झाल्यामुळे प्रहर्षणालंकार. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. ३०. 'मदोन्मत्त करटी भीतीने न निवसति ' यावरून मृगपतीचा दर्प व विक्रम द्योतित झाला. 'करिवरविमुक्ता। याने मृगपतीचा शौयांतिरेक सूचित झाला. 'मुक्तामाला ' पदाने मुक्तांचा अपरिमितपणा स्पष्ट झाला. परलोका जातांक्षणिच ' यानें क्षुद्रपशृंचा मृगपतीच्या मृत्यूनें उल्लास प्रदर्शित झाला. 'शिवा घोष करिती ' या पदाने सिंहगुहेचे नितांतदैन्य ध्वनित झाले. वीर, करुण, भयानक आणि शान्त रस. छेकानुप्रास. शिखरिणी वृत्त. ३१. मालाकाराची करुणा ही कुसुमोद्गमाला कारण असते. ती नसतां प्रस्तुतस्थली कुसुमोद्गमरूप कार्य घडलें यास्तव विभावनालंकार झाला. दुसऱ्या दोन चरणांनी बालबकुलाचा उत्कर्ष स्फुट झाला. शेवटल्या चरणाने कुसुमगंधाचें अद्वितीयत्व व प्राचुर्य ही ध्वनित झाली. यमक आणि छेकानुप्रास हे शब्दालंकार. वीर रस. शिखरिणी वृत्त. ३२. करुण रस. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित वृत्त. ३३. दुसऱ्या चरणावरून चातकाला जलधराशिवाय अन्याचा आधार नाही हे सूचित झाले. जलाविषयीं अत्यंत उत्कंठित अशा चातकावर गारांची वृष्टि ही अननुरूप घटना झाली यास्तव विषमालंकार झाला. 'करुणाकरा ' पदांत स्तुतीने निंदा गम्य झाली ह्मणून व्याजस्तुति. छेकानुप्रास. करुण रस. शार्दूलविक्रीडित वृत्त. ३४. पहिल्या दोन चरणांनी तरुवरांचे मेघपरायणत्व सूचित