पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. २५. 'करिवाळा ' यांतील 'बाळा ' या पदाने कलभाची मूढता सूचित झाली. 'आला' यानें अप्रार्थित आगमन, आणि ह्मणूनच आदराची अवश्यकता ही ध्वनित झाली. उत्तराधाने अलीची संमानार्हता सुव्यक्त झाली. थोरांचे आगमन आदरणीय होय हे व्यंग्य. काव्यलिंग अलंकार. छेकानुप्रास. छंद गीति. २६. देवद्रुमसुमगंधा ' यांतील देवशब्दाने सुमगंधाचें अलौकिकत्व सूचित केले. 'अन्यसुमी' यांतील अन्य शब्दानें सुमाची अधमता व्यक्त केली. थोराने हलके काम करणे योग्य नव्हे असा भाव. छंद गीति.. २७. 'मधुपाला तव उपमा न लाभली ' यावरून आम्राचा अनन्यसाधारण उत्कर्ष घोतित झाला. 'पिकांस पुशिलें' यावरून पिकांचा रसिकपणा ध्वनित झाला. वृत्यनुप्रास आणि छेकानुप्रास. वृत्त गीति. २८. ' ती कधिं तरी असे शक्य ' इत्यादिकानें वारिदाचें असामर्थ्य व्यक्त होऊन किंचित अधिक्षेपही द्योतित झाला, ह्मणून प्रतीपालंकार. 'धो धो' याने वारिदाची जलसंपत्ति स्फुट झाली, 'वर्षासमयि । येणे करून पर्जन्यकालाहून अन्यकाली वारिदाची गतश्रीकता सूचित झाली. आपत्काली अत्यल्पही साहाय्याची जी किंमत आहे ती अनुकूल कालांत मोठ्याही साहाय्याची नाही हे व्यंग्य.छेकानुप्रास. मंदकान्ता वृत्त. शान्त रस. २९. 'मरुपांतांत 'या पदानें संकटाचा अतिरेक दर्शविला. संहारहेतु असून संहारकार्य उक्त नाही ह्मणून विशेषोक्ति अलंकार. 'मरुप्रान्त ' या हेतुगर्भ विशेष्यपदाने परिकरांकुर अलंकार झाला. वांछितार्थापेक्षा अधिक अशा अमृतसिंचन