पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. ११५ असा भाव. थोर लोक प्राणहानि होण्याचा प्रसंग आला तरी आपला थोरपणा सोडीत नाहीत हे व्यंग्य. गीतिच्छंद. २२. ' नोहे फल, नोहे दल, नोहे सुम, ' यांनी केवळ गुणांचा अभाव प्रकट केला. ' भवति कांटे' या पदांनी दोषाकुलता व्यक्त झाली. 'वैभव ' पदाने व्याजोक्ति स्फुट झाली. 'जवळिं यावया लाज वाटे' इत्यादिकानें बाभळीच्या समागमाची दुष्टता व विफलता ही निश्चित झाली. फलदलसुमहीनता, कंटकावृतता एतदर्थक हेतुगर्भ विशेषणपदांनी परिकरालंकार झाला. छेकानुप्रास व वृत्यनुप्रास शब्दालंकार. छंद गीति. २३. 'विपिनीं' या पदानें संकट प्राप्त झाले असतां कोकिलाच्या मदतीला कोणी स्वजन धावून येण्याचा मुळीच संभव नाहीं हे सूचित झालें. समजातीय समजुनी' येथे सजातीयाविषयीं भ्रान्ति ह्मणून भ्रांतिमदलंकार झाला. आपल्या भोवतालचे लोक ओळखून त्याप्रमाणे वर्तनक्रम ठेवणे हे योग्य असा व्यंग्यार्थ. गीतिच्छंद. २४ ' भवानीपित्या ! ' या पदाने हिमालयाचे महत्व सूचित झालें. पूर्वार्धगत अर्थावरून हिमानीची दोषाकुलता व्यक्त झाली, 'पित्या ' या पदाने हिमालयाची अपत्यसंपन्नता, प्रौढ. वयस्कता आणि ह्मणूनच पार्वतीशिवाय अन्यस्त्रीच्या आभिलापाची अननुरूपता व्यंजित झाली. 'हिमानी ' या स्त्रीलिंगि पदावरून, ' भवानीपित्या' या पुल्लिंगी शब्दावरून आणि - शिरावरि धरिशी ' या पदांच्या डोक्यावर नाचवितोस' या अर्थान्तरसंभवावरून एकंदर अनुरक्त नायिकानायक यांचा अप्रस्तुत वृत्तांत स्फुरित झाला ह्मणून समासोक्तयलंकार झाला. छेकानुप्रास शब्दालंकार. गीतिच्छंद.