पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४. महाराष्ट्र भामिनीविलास. १७. पूर्वार्धात पूर्णीपमालंकार. 'जनतोषास्तवचि' याने मारुताची निरपेक्ष लोकरंजनदीक्षा सुव्यक्त झाली. मारुत अनादरणीय नव्हे हे तात्पर्य. यमकालंकार. शांत रस. छंद गीति. १८. ' मंजुल गुंजत असतां ' एणेकरून अलीचें संलापचाबर्य सूचित झालें. ' मौन न धरी ' इत्यादिकावरून नायिकेचे मुग्धत्व ध्वनित झाले. ' मौन ' आणि 'शिरीं' यांच्या लाक्षणिक अर्थावरून लष व्यंजित होतो. प्रथमार्धातील वाक्यार्थाला द्वितीयार्धातील वाक्यार्थ हेतुभूत असल्यामुळे काव्यलिंग अलंकार झाला. छेकानुप्रास व वृत्यनुप्रास हे शब्दालंकार. रस शृंगार. वृत्त गीति. १९. 'उन्नति किति वानावी ' इत्यादिकाने पाटीराची स्तुतिरूपानें निन्दा झाली यास्तव व्याजस्तुति अलंकार झाला. करुण रस; गीतिच्छंद. २०. 'मुर' शब्दाने तरुकुसुमांचे पावित्र्य व उत्कृष्टत्व ही योतित झाली. 'अन्य गंध लाजवी' यावरून अन्य गंधांचा धिक्कार झाला आणि सुरतरुकुसुमांचा उत्कर्ष सूचित झाला; यास्तव प्रतीपालंकार झाला. 'षट्पदा' याने निन्दा गम्यमान झाली. 'तुझी धन्य ' एणेकरून व्याजोक्ति अलंकार झाला. गीतिच्छंद. २१. 'विंध्यकन्यके' एणेकरून तटिनीचे उच्चकुलजन्म सूचित झालें. 'विध्यकन्यके' आणि 'पावने । या हेतगर्भ विशेषणसामर्थ्याने परिकरालंकार. 'रथ्या' शब्दाने त्यांतील जलाचें मालिन्य व दुर्गधीपणा ही सूचित झाली. रस्त्यांतील पाणी घेणे हे कर्म जीवनसंकट प्राप्त झाले तरी देखील तुला अत्यंत अनुचित