पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. ११३ १४. चवथ्या अन्योक्तीमधील अर्थ वेगळ्या रीतीने या अन्योतीत आला आहे. 'स्वच्छन्दें लुटुनी ' या पदांनी मरन्दाची विपुलता सूचित झाली. 'अमन्द गावोत ' एणेकरून अलींचा आनंदातिशय घोतित झाला. 'स्मित ' शब्दानें कमलांचे सौभाग्य व रसपरिपूर्णता ही व्यक्त झाली. 'पवनाविणे कोणीही समर्थ न, यावरून पवनाचा अनन्यसाधारण उत्कर्ष ध्वनित झाला. शांत रस, प्रहर्षिणी वृत्त. १५. 'संतापाकुल' या शब्दानें पांथांचे परम दैन्य सूचित झाले. 'कोणाकडे पाहिल ' यानें अन्यदात्याचा अभाव व कासाराची पांथविषयक करुणा ही व्यंजित झाली. ' सारखें झुरणिला लागे' यावरून कासाराचें नितांतमृदु अन्तःकरण ध्वनित झाले. 'जीवन ' पदाने लेप सूचित झाला. 'वारिधि ' या हेतुगर्भ विशेष्याच्या सामर्थ्याने परिकरांकुर अलंकार झाला. वारिधींचा अधिक्षेप करून कासाराची धन्यता प्रतिपादन केली एणे करून प्रतीप अलंकार झाला. छेकानुप्रास. पूर्वार्धात करुण रस; उत्तरार्धात वीर रस. शार्दूलविक्रीडित वृत्त. १६. 'पतंग ' शब्दानें हंस, सारस इत्यादि पक्षी घ्यावयाचे. पतंगांचे आकाशविहरण आणि गसमुदायाचें आम्रमंजरीवर अधिष्ठान वा त्या पक्ष्यांच्या स्वभावसिद्ध क्रिया आहेत, त्यांचे वर्णन झाल्यामुळे स्वभावोक्ति अलंकार झाला. 'पद्माकरा ' पदानें सरोवराची संपन्नता व्यक्त झाली. शेवटच्या चरणाने मीन अनन्यगतिक असल्यामुळे सर्वथा अनुपेक्षणीय आहे हे ध्वनित झालें, 'दीन, ' आणि 'गतिहीन ' या हेतुगर्भ विशेषणांनी परिकरालंकार झाला. वृत्त्यनुप्रास आणि छेकानुप्रास. करुण रस. वसन्ततिलक वृत्त.