पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. चवथा शांतविलास. यांत बहुतेक भक्तिरसात्मक श्लोक आहेत. आणि ते फार प्रेमळ आणि गोड आहेत. प्रतिपाद्यविषयाशी तादात्म्य पावणे हे खऱ्या कवीचें लक्षण आहे. हे जगन्नाथाच्या काव्यांत चांगले प्रतीतीस येते. रससंबंधानें परस्परविरोधी किंवा परस्पराहून भिन्न अशा भर्तृहरिरुत तिन्ही शतकांत जसा चहूंकडे एक थाट; किंवा प्रसिद्ध महाराष्ट्र कवि रामजोशी यांच्या शृंगारावरील आणि वेराग्यपर लावण्यांत जसा येथून तेथून एक रंग, तसाच प्रकार पंडितांच्या प्रस्तुत चारी विलासांमध्ये आढळून येतो. शांतविलासाची कांहीं पयें कवीने आत्मश्लाघापर रचिली आहेत. कविकुलगुरूने अनेक स्थली आपली परमशालीनता व्यक्त करावी आणि जगन्नाथकवीने ठिकठिकाणी आपल्यासंबंधानें दर्पोक्ति प्रकट करावी यांत मनुष्यस्वभावाचे वैचित्र्य तर दृग्गोचर होतेच; तथापि आपल्या कृतीचा अनादर होऊ लागल्यामुळे भवभूतीप्रमाणे याही कवीला आत्मप्रशंसा करण्याचा प्रसंग आला की काय अशी शंकाही मनांत येते; तरी पण पंडितांच्या उज्ज्वल गुणांना विनयाने अधिक शोभा आली असती असे लिहिल्याखेरीज राहवत नाही! न आतां प्रस्तुत भाषांतराविषयी चार शब्द लिहितो. आमचे नासिक येथील प्रसिद्ध संस्कृतकवि पंडित अच्युतराय मोडक यांनी प्रणयप्रकाश नांवाची टीका भामिनीविलासग्रंथावर केली आहे. या टीकेसहित तो ग्रंथ निर्णयसागरांत छापून प्रसिद्ध झाला आहे. यांतील मूल-क्वचित् कोठे पाठान्तरादिक फेरफार करून-भाषांतराकरितां कायम केले आहे. मूळांतील श्लोकाचा १ शांतविलासांतील ‘मद्वाणि मा कुरु विघादमनादरेण' इत्यादि श्लोक पहा.