पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. तात्पर्यार्थ मनांत आणून तो भाषांतरांत आणण्याचा प्रयत्न केला आहे; आणि एवढ्याच अर्थार्ने भाषांतराला छाया अर्से मटले आहे. मूळांतील एका श्लोकाचा भाषांतरांत प्रायः एकच श्लोक झाला आहे. विशेषतः 'मेघदूत काव्याचें समवृत्त मराठी भाषान्तर' यांत, आणि एके ठिकाणी 'पद्यमंजरी' काव्यांत जसा पूर्णश्लोकापुढे श्लोकार्ध घातला आहे तसा प्रकार प्रस्तुत भाषांतरांत कोठेही नाही. मलांतील वृत्ताहन भाषांतरांत कोठें कोट भिन्न वृत्ते योजली आहेत. साकी आणि दिंडी या प्रारुत परंतु गोड वृत्तांचा स्थलविशेषीं आदर केला आहे. मूलश्लोक वरती देऊन त्याच्या खाली भाषांतराचा श्लोक दिला आहे. त्यामुळे भाषांतर कसें उतरले आहे हे वाचणारांस अनायासे समजेल. श्लोकांतील कठिण शब्दांचा अर्थ पृष्ठाखाली टिपांतून दिला आहे. श्लोकांचा मार्मिक अर्थ विद्या र्थ्यांस समजावा या हेतूने या ग्रंथाला जोडलेल्या दुसऱ्या परिशिष्टांत संक्षिप्त टिपा दिल्या आहेत. यांत रस, ध्वनि, अलंकार, पदस्वारस्य, वृत्त इत्यादि गोष्टींचे थोडेबहुत दिग्दर्शन केले आहे. क्वचित् पाठान्तरे देऊन दुसरेही कांहीं अल्पस्वल्प फेरफार केले आहेत. भाषांतर तात्पर्यार्थरूपाने असल्यामुळे मळांतल्यापेक्षा त्यांत अलंकारादिकांचा न्यूनाधिकभाव झाला आहे. त्याचेही स्पष्टीकरण या टिपात यथामति केले आहे. अच्युतरावजी मोडक यांच्या टीकेसह निर्णयसागरांत छापलेला भामिनीविलास, रा. रा. शिवराम महादेव परांजपे, एम. ए., यांनी इंग्रजी शिकणान्या विद्यार्थ्यांकरितां छापून प्रसिद्ध केलेली भामिनीविलासाची सुंदर आवृत्ति, कै. पंडित दुर्गाप्रसाद यांनी शुद्ध केलेला आणि निर्णयसागरांत छापून प्रसिद्ध