पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. बहुतेक अन्योक्ति आहेत आणि काही केवळ सुभाषिते आहेत. हा अन्योक्तिविलास फार सुंदर व बोधप्रद आहे. कारण अन्योक्तिरूपाने यांत कवीने व्यवहारांतील किती तरी गोष्टी मार्मिक रीतीने सुचविल्या आहेत ! प्रस्तुतविलास प्रसन्न व रमणीय असा व्यवहारादर्शच आहे असे वाटते. विद्यार्थ्यांनी हा विलास गुरुमुख शिकून पाठ करून ठेवण्यासारखा आहे. बहुश्रुत व चतुर हरिदास प्रस्तुत विलासांतील अन्योक्ति ह्मणून कीर्तनास मोठा रंग आणतात. दुसरा शृंगारविलास. यांत विलासाचे अनेक प्रसंग कल्पून कवीने भामिनीविषयक लीला वर्णिल्या आहेत. यांतील काही श्लोकांत शृंगाराचा अतिरेक झाला आहे यास्तव त्यांचे मराठीत भाषांतर केले नाही. तथापि वाचणारांना मूलग्रंथ समय मिळावा एवढ्याकरितां ते श्लोक या ग्रंथाला जोडलेल्या पहिल्या परिशिष्टांत दिले आहेत. या विलासांत कित्येक पये फारच मधुर आहेत. तिसरा करुणविलास. आपली पत्नी लोकांतगला गेली तेव्हां कवीने तिच्यासंबंधाने आपले उद्गार या विलासांत पद्यांमध्ये ग्रथित केले आहेत. कविकुलगुरूच्या अजविलापांतील कल्पनाचातुर्य व रसपरिपोष ही प्रस्तुत करुणरसप्रधान चुटक्यांत अनुभवाला येत नाहीत. प्राणप्रियेच्या विरहानलज्वालेने होरपळून जाणाऱ्या कवीच्या निसर्गसिद्ध करुणालापांत श्लेषचम स्काराला अवकाशच मिळू नये. तथापि तसा प्रकार करुणविलासांत आढळतो'. असो. कै. कृष्णशास्त्री चिपळुणकर यांनी करुणविलासाचे शिखरिणीवृत्तांत मराठी भाषांतर करून तें आपल्या रसिकमान्य पद्यरत्नावलीकाव्यांत छापिलें आहे. १ श्लोक सतरावा.