पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ महाराष्ट्र भामिनीविलास. चन्दनाचे माहात्म्य अनिर्वचनीय आहे हे सांगून पुढच्या अर्धात त्याचे कारण सांगितले आहे ह्मणून काव्यलिंग अलंकार. वृत्यनुप्रास शब्दालंकार. शान्त रस. गीतिच्छंद. ११. ' खण्डुनि चूर्णिति ' या पदांनी निघृणत्वाची परमसीमा घोतित झाली. 'तयांहि गंधे सुखविशि' एणेकरून चंदनाची निसर्गरमणीय करुणापरता व्यक्त झाली. 'तव क्रम आदरायाला कवण शक्त असे ' इत्यादिकानें चंदनाचे अलौकिक उपकारित्व ध्वनित झाले. 'चूर्णिति तुज' याबद्दल 'चुरिति तुला' हा पाठ कल्पावा. काव्यलिंग अलंकार. शान्त रस. गीतिच्छंद. १२. 'कवण दुजा कुलव्रत अखंड पाळील' इत्यादिकानें हंसाचे नीरक्षीरविवेचकत्व अनन्यसाधारण आहे हे सूचित झाले. शांत रस. गीतिच्छंद. १३. 'असिधारेसम तीव्र' आणि 'क्रूर भुजंगेंद्रतुल्य वरि दिसती' हा पूर्णोपमालंकार झाला. कारण पहिल्यांत उपमान 'असिधारा,' उपमेय 'थोरजन,' सामान्य धर्म ‘तीव्रता' आणि वाचकपद 'सम' ही उक्त आहेत; तशीच दुसऱ्यांत 'भुजगेंद्र' हे उपमान; 'थोर जन ' हे उपमेय; 'कौर्य' हा सामान्य धर्म; आणि 'तुल्य ' हे वाचकपद उक्त आहे. 'द्राक्षाहुनि अधिक गोड ' यांत द्राक्ष या उपमानापेक्षा 'थोरजन' या उपमेयाचे अंतर्गत माधुर्यासंबंधाने आधिक्य वर्णित झाले ह्मणून येथे व्यतिरेकालंकार झाला. 'भमि भषविती । एणेकरून थोरजनांची धन्यता प्रकट झाली. या पयांत साधुचरित्रवर्णन झाले ह्मणून स्वभावोक्ति. छेकानुप्रास शब्दालंकार. शांत रस. गीतिच्छंद.