पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १११ मिळेल हे व्यंग्य. छेकानुप्रास व यमक हे शब्दालंकार. शान्त रस. छंद गीति. ७. घटाला फांस घालून दोर विहिरीत सोडतात हे कूपाचे गुणग्रहण झाले. प्रथमार्धातील अर्थाला द्वितीया(तील अर्थ हेतुभूत आहे; यास्तव काव्यलिंग अलंकार झाला. शान्त रस; छंद गीति. ८. 'बक ' या पदाच्या कठोर ध्वनीनेच बकांचे अधमत्व व्यंजित झाले. 'परिणतमकरन्दमर्मवेत्ते' या पदानें भ्रमरांची कमलिनीभोगार्हता सूचित झाली. 'भ्रमर चिरायु असोत ' याने वक्त्याची कमलिनीविषयींची अनुकंपा ध्वनित झाली. पहिल्या अर्धात विषाद करूं नको असे सुचवून दुसऱ्या अर्धात त्याचा हेतु उपन्यस्त केला आहे म्हणून काव्यलिंग अलंकार. छेकानुप्रास. पुष्पिताग्रा वृत्त. करुण रस. ९. पूर्वार्धाने मधुकराचे विलासशालित्व व उन्नति ही स्पष्ट झाली. उत्तरार्धाने त्याची विपन्नावस्था सूचित झाली. 'रसपरिपूर्ण' व 'प्रफुल्ल' या हेतुगर्भ कमलविशेषणांनी परिकरा. लंकार झाला. 'मधुकर ' या विशेष्यपदाच्या यौगिक अर्थावरून जर त्यांतही हेतु कल्पिला तर परिकरांकुरालंकारध्वनि होईल. द्वितीया(नें वक्त्याची मधुकरविषयक साश्चर्यखिन्नता व्यंजित झाली. छेकानुप्रास; करुण रस; छंद गीति. १० 'कवण वर्णाया शके ' इत्यादिकानें महिम्याचे निःसीमत्त्व स्पष्ट झाले. ' मुखाने गरल टाकिति ' याने भुजंगांचे सर्वथात्याज्यत्व सूचित झाले. 'गंधभरें ' या पदाने चंदनाचे अपकार करणाराविषयी मुद्रां परमकारुणिकत्व ध्वनित झाले. प्रथमार्धात