पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० महाराष्ट्र भामिनीविलास. हलक्या माणसाकडे प्राप्त झाला असतां तो त्याचा अपमान करूं लागला इत्यादि गोष्ट प्रस्तुतत्वेकरून कथित झाली. 'देवें' या पदानें मधुकराचें आदरणीयत्व सूचित झाले. 'कुटजा' या संबोधनाने त्या वृक्षाचा अधमपणा व्यंजित झाला. 'रसपूर्ण' या पदानें कमलिनींची विदग्धता व उपभोगार्हत्व ही ध्वनित झाली. 'कमलिनी' या स्त्रीलिंगिपदाने मधुकरावर अनुरक्त होण्याची त्यांची नैसर्गिक पात्रता व्यक्त झाली. 'मधुकर ' पदानें भ्रमराचें गुणशालित्वा व मधुकर या एकवचनाने व कमलिनींच्या बाहुल्याने मधुकराची प्रौढता, विलासशालिता व असाधारण उपभोगार्हता ही गम्यमान झाली. माननीयांचा मान ठेवणे अवश्य व योग्य होय हे या श्लोकांतील व्यंग्य आहे. निःसीम आदराने कमलिनींचा मधुकरविषयक प्रेमातिरेक सूचित झाला. 'न दावि अवमान' या वाक्यगत अर्थाला 'रसपूर्ण कमलिनी त्या (नि:सीम ) आदर दाविती' हा वाक्यार्थ हेतुभूत झाला; ह्मणून येथे कायलिंग अलंकार झाला. करुणरस. छोकानुप्रास आणि यमक हे शब्दालंकार. वृत्त गीति. ६. रसालतरुवरि रसिकवर भंगसंघ जमतिल' याने अनुरूपवस्तुसंयोग सूचित झाला. 'नीरस । पदाने विहारराहित्य व कोकिलाची विमनस्कता ही व्यंजित झाली. 'विपिनांतरिं' याने एकांतवास ध्वनित झाला. 'नीरस दिन कंठावे' इत्यादिकांनी 'डोळे मिटून चार दिवस काढ,' अशा लोकप्रवादाची अनुरुति झाली ह्मणून लोकोक्तिनामक अलंकार झाला.'तंवर ' पदाने कोकिलाच्या विपन्नावस्थेचें भंगुरत्व सूचित झालें. धैर्य धरून संकटाचे चार दिवस कसे तरी कंठावे असा भाव. आघांचा विकास झाला झणजे तुला यथेच्छ मकरंद