पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १०९ वध ' एणेकरून अत्यंत अनुकंपाहत्व ध्वनित झाले. प्राचीकडे पाहतां' यावरून नवचंद्राविषयीं उत्कण्ठा व्यक्त झाली. 'हंसतां' या पदानें पद्मांची प्रफुल्लता स्पष्ट झाली. जो अनंग आहे त्याला कार्य करणे संभवत नाही. आणि येथें तर अनंग धनुष्टंकाररूप कार्य करीत आहे. अनंग हा शब्द जरी योगसूढ आहे तरी त्याचे अनंगत्व ह्मणजे निरङ्गत्व यौगिकत्वाने मनांत येतें ह्मणून येथें विभावनालंकाराचा ध्वनि झाला असें समजावें. 'धनुचा टंकारही काढितां' याने त्या कालाची कामोद्वीपकता व्यक्त झाली. 'मानवती' शब्दानें कलहान्तरिता नायिका व्यंजित झाली. 'मान प्रस्थानोत्सुक होत असतां' यावरून नायिकाची रमणोत्कण्ठा प्रतीत झाली. शेवटच्या चरणाने विधात्याची अननुरूपकार्यप्रवृत्ति सूचित झाली. छेकानुप्रास आणि वृत्त्यनुप्रास हे शब्दालंकार यांत आहेत. पहिल्या तीन चरणांत शृंगार व चवथ्यांत करुण रस आहे. वृत्त शार्दूलविक्रीडित. ४. यांत कमलादिकांच्या अप्रस्तुत वृत्तान्ताने आपल्या संपन्न यजमानाची कीर्ति निरपेक्ष पसरणाचा आश्रिताची स्तुति वर्णित झाली. ' मधुर । शब्दानें मरंदाचें प्राशनार्हत्व व्यक्त झाले. 'स्वेच्छ' पदानें मरंदाचे वैपुल्य ध्वनित झालें । मंज ताना घेवोत' एणे करून अलींचा हर्षातिरेक ध्वनित होऊन कमलांची स्तुतिही व्यंजित झाली. 'काही निराळा । झणजे अगदी अलौकिक. पवनाचें अन्यत्वानें ह्मणजे अलौकिकबंधुत्वाने येथे वर्णन झाले ह्मणून भेदकातिशयोक्तिनामा अलंकार झाला. छेकानुप्रास शब्दालंकार. शांत रस. मालिनी वृत्त. ५. यांत कुटज आणि मधुकर यांच्या अप्रस्तुत गोष्टीने कोणा एका धनिकाजवळ राहणारा गुणी मनुष्य दैवयोगाने