पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ महाराष्ट्र भामिनीविलास. २. यांत द्विजेन्द्रकलहंसवृत्तान्त अप्रस्तुत आहे; तो पूर्वी संपन्न स्थितीत असलेल्या परंतु दैवदुर्विलसितार्ने प्रस्तुत विपन्न दशेस प्राप्त झालेल्या थोर पुरुषाच्या प्रस्तुत वृत्तांतामध्ये पर्यवसित झाला आहे. 'कमलांतला पराग यज्जीवन सुगंध करी' या वाक्याने मानससरोवराची समृद्धि व सौभाग्य ही सूचित झाली. मानससरोवरावर ब्रह्मदेवाचे अधिष्ठान आहे, यामुळे 'मानस ' या शब्दाने त्या सरोवराचे पावित्र्य व उन्नतत्व ही ध्वनित झाली. पहिल्या दोन चरणांवरून पूर्ववय परमस्पृहणीय ऐश्वर्यात निघून गेले हा अर्थ सुव्यक्त होतो. 'प्रथम ' याचा अर्थ पूर्वी असा घ्यावयाचा. 'द्विजेन्द्र ' या पदानें कलहंसाचें व्यतिरेकाने इतर पक्ष्यांहून अधिक वैभवशालित्व द्योतित झाले. ' वसति केवि करी ' इत्यादिकानें कलहंसाचे दैन्य अनुमित होते. 'पल्वल ' शब्दानें स्थल व जल या उभयतांचा संकोच व्यंजित होऊन स्थलाचा अधमपणाही गम्यमान झाला. ' मलिन' या विशेषणाने पल्वलाचा निंद्यपणा स्पष्ट झाला. 'जमति ज्यांत भेकावली ' यावरून पल्वाची दुर्दशा व विघ्नबहुलता ही सूचित झाली. ज आणि व यांची एकवार आवृत्ति आल्यामुळे छेकानुप्रास झाला. पूर्वी ज्याने ऐश्वर्य उपभोगिलें त्याला पुढे दैन्य हे अत्यंत कष्टप्रद होते हे व्यंग्य या पद्यांत आहे. 'जीवन ' अशी वर्णाची क्रमानें आवृत्ति झाल्यामुळे यमकालंकार झाला. रस करुण; वृत्त पृथ्वी. ३. यांत विधि आणि विधु यांची गोष्ट अप्रस्तुत आहे. तिच्यावरून विनाशोयुक्त खल आणि नवीन अभ्युदय पावणारा पुरुष यांची गोष्ट प्रस्तुतत्वाने उपस्थित होते. 'तृण्णाचंचल' या पदानें चकोरवधूंचे अनन्यगतिकत्व सूचित होते. 'चकोरक