पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. १०७ ग्रहण होते; तिसऱ्यांत प्रस्तुतवस्तु कारणस्वरूपानें मनांत येते; चवथ्यांत प्रस्तुतवस्तु सामान्यरूपानें पर्यवसित होते; आणि पांचव्यांत प्रस्तुतवस्तु विशेषरूपाने उपस्थित होते. प्रस्तुतविलासांतील पहिल्या पांच श्लोकांतील अन्योक्तिस्वरूप व्यक्त करून दाखविले आहे. पुढे विस्तरभयास्तव तसें केले नाही. वाचकांनी आपल्या कल्पनेने पुढे येणाऱ्या अन्योक्ति बसवाव्या. यापुढे श्लोकक्रमानेच टिपा दिल्या आहेत. १. यांत मृगपतिरूप अप्रस्तुत वस्तूच्या कथनानें तत्सदृश पण्डितराजरूप प्रस्तुत वस्तूची प्रतीति झाली. यास्तव या ठिकाणी सादृश्यमूलक अप्रस्तुतप्रशंसा हा अलंकार झाला. या पद्यांत आशीर्वाद किंवा नमस्कार याच्या रूपानें मंगल केलेले दिसत नाही. पण्डितराजरूप वस्तूचा निर्देश यामध्ये झालेला आहे. 'मदोन्मत्त करिकुल' या शब्दांनी विलक्षणप्रतिभाशाली व्यासवाल्मीकिकालिदासभवभूति इत्यादि कवीन्द्र, 'करुणापात्र करिणी ' या पदांनी अनुकंपनीय कवयित्री, आणि 'निजबळें न्यून मृग' एणे करून क्षुद्र कवि यांचे ग्रहण होते. 'मदोन्मत्त करिकुल दिगन्ताला गेलें ' याने प्रतिभाशाली कवीन्द्रांची नामशेषता ध्वनित झाली. 'करिणी ' या स्त्रीलिंगि पदावरून अनुकंपनीयता सुव्यक्त झाली. 'निजबळे न्यून मृग' यावरून मृगांची तुच्छता सूचित झाली. 'प्रखरनखलीला ' याने पाण्डित्यप्रकर्ष व्यंजित झाला. 'मृगपति प्रखरनखलीला कोठे दावी' यावरून पण्डितराजाच्या तोडीचा कवि उर्वीतलांत उरला नाही हैं व्यंग्य प्रतीत झाले. क, ख, आणि ल या व्यंजनांची एकवार आवृत्ति आली आहे ह्मणून छेकानुप्रास हा शब्दालंकार झाला. र याची अनेकवार आवृत्ति आल्यामुळे वृत्यनुप्रासनामा. शब्दालंकार झाला. यांत रस वीर; श्लोकाचे वृत्त शिखरिणी.