पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. ( अन्योक्तिविलास.) अन्योक्ति या समासघटित पदामध्ये दोन शब्द आहेत. एक अन्य व दुसरा उक्त. अन्य ह्मणजे अप्रस्तुत, अप्ररुत किंवा अवय होय; आणि उक्ति ह्मणजे कथन किंवा वचन. तेव्हां अन्योक्ति ह्मणजे अप्रस्तुत, अप्रकृत, किंवा अवर्ण्य वस्तूचे कथन असा अर्थ झाला. अन्योक्तीला अप्रस्तुतप्रशंसा असें दुसरे नांव आहे. अप्रस्तुतप्रशंसा झणजे अप्रस्तुताचे कथन. जेथें अप्रस्तुत वस्तूच्या वर्णनाचे पर्यवसान सादृश्यादिकांनी प्रस्तुत वस्तूवर होतें तेथें अन्योक्ति अथवा अप्रस्तुतप्रशंसा हा अलंकार होतो. 'अप्रस्तुतप्रशंसा सा या सैव प्रस्तुताश्रया ? अर्से या अलंकाराचे मम्मटाचार्यानी लक्षण दिले आहे. त्याचा अर्थ असाः-जेथें अप्रस्तुत व्यवहाराचे वर्णन प्रस्तुत विषयावर पर्यवसित होतें तेथें अप्रस्तुतप्रसंशा हा अलंकार जाणावा. वर दिलेल्या लक्षणावर आचायांनी वृत्ति लिहिली आहे ती अशी:- अप्राकरणिकस्याभिधानेन प्राकरणिकस्याक्षेपोऽप्रस्तुतप्रशंसा.' अप्रस्तुताच्या वर्णनाने प्रस्तुताचे ग्रहण होते त्या ठिकाणी अप्रस्तुतप्रशंसा हा अलंकार होतो, असा या वृत्तीचा अर्थ आहे. रसगंगाधरकारांनी अन्योक्तीचे लक्षण दिले आहे ते असेः-' अप्रस्तुतेन व्यवहारेण सादृश्यादिवक्ष्यमाणान्यतमप्रकारेण प्रस्तुतव्यवहारो यत्र प्रशस्यते साऽप्रस्तुतप्रशंसा. ' याचा अर्थ वर दिलेल्या मराठी लक्षणांत तात्पर्यरूपाने आलाच आहे.. अन्योक्ति पांच प्रकारची आहे. एका प्रकारांत प्रस्तुत वस्तूची सादृश्यावरून प्रतीति होते; दुसऱ्यांत प्रस्तुत वस्तूचें कार्यरूपाने