पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. रसगंगाधरग्रंथांत उदाहरणार्थ घेतलेली आढळतात. एकंदरीत सगळे श्लोक प्रसंगाप्रसंगाने रचलेले असून त्या सर्वांचा संग्रह प्रस्तुत पुस्तकांत केला आहे असे दिसते. एका पद्याचा दुसऱ्या पद्याशी संबंध नसल्यामुळे ती पये इतर लोकही आपल्या नांवावर प्रचलित करतील ह्मणून जगन्नाथाने ती सगळी पद्यं प्रस्तुत ग्रंथाच्या रूपाने एके ठिकाणी केली असें भामिनीविलासांतील शेवटच्या पद्यावरून लक्ष्यांत येईल.' प्रस्तत काव्याला कवीने भामिनीविलास हे नांव कां दिले याच्यासंबंधानें थोडा मतभेद आहे. प्रो. तारानाथ यांचे मत असें आहे की, भामिनी नांवाची जगन्नाथाची स्त्री होती तिच्या स्मरणार्थ प्रस्तुत ग्रंथ त्याने रचला. भामिनी हा शब्द केवळ विशेषनामासारखा प्रस्तुत काव्यांत अनेक ठिकाणी योजलेला आहे. यावरून वरील मत ग्राह्य आहे असे दिसून येईल. शिवाय जगन्नाथाचा नातू महादेव याने भामिनीविलासावर टीका केली आहे. तिच्यांत करुणविलासांतर्गत प्रथमपद्यांतील 'बंधुरत्ने' या पदावर त्याने 'गृहिण्याम्' असा पर्याय दिला आहे. यावरूनही वरील मताला अधिक पुष्टि येते. कोणाचें मत असे आहे की, भामिनी ही एक कल्पित नायिका होती तिला उद्देशून कवीने प्रस्तुत ग्रंथ लिहिला. marati भामिनीविलासग्रंथाचे चार विलास अथवा भाग आहेत. पहिला अन्योक्तिविलास किंवा प्रास्ताविकविलास. यांत १ दुर्वृत्ता जारजन्मानो हरिष्यन्तीति शंकया । मदीयपद्यरत्नानां म. जूषैषा कृता मया ।।. २ शृंगारविलास श्लोक पहिला. करुगविलास श्लोक चवथा आणि सतरावा. आणखीही उदाहरणे सांपडतील.३ रा. रा. परांजपे यांची प्रस्तावना पृष्ठ २०.