पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. वर कोटि करण्याचे चातुर्य, आणि पांडित्य ही उत्कृष्टपणे व्यक्त झाली आहेत. गंगालहरी, सुधालहरी, करुणालहरी, अमृतलहरी, लक्ष्मीलहरी, भामिनीविलास, आसफविलास, जगदाभरण, प्राणाभरण, यमुनावणेन इत्यादि ग्रंथांत सहृदयाला आल्हाद देणारी अशी जगन्नाथाची रमणीय काव्यस्फूर्ति विशेषतः गोचर होते. प्रस्तुत कवीची वाणी प्रौढ, सरळ, मधुर आणि सतेज आहे. तो उत्तम काव्याचे मर्म जाणणारा आणि उत्तम काव्याचा कर्ताही होता यांत संशय नाही. तथापि त्याचे चित्रकाव्यावरही पराकाष्ठेचे प्रेम होते, ही गोष्ट त्याच्या कोणत्याही दहा पांच कविता वाचून देखील लक्षात येण्यासारखी आहे. प्राचीन महर्षि व्यासवाल्मीकि, किंवा त्यांच्या मानाने अर्वाचीन कालिदासभवभूत्यादि सरस्वतीचे कण्ठमणि यांच्या लोकोत्तर वाणीशी पंडितांची वाणी बोलू शकत नाही हे खरे; तथापि गेल्या पांच चार शतकांत जे संस्कृत कवि झाले त्यांच्या मालिकेत पंडितांना अग्रेसरत्वाचा मान आहे यांत संशय नाही. भामिनीविलास हा ग्रंथ पद्यात्मक आहे. यांतील अनेक पयें २ हे भागीरथीचे घावन पद्यांचे स्तोत्र प्रसिद्ध आहे. याला पीयूपलहरी असेही नांव आहे. २ सूर्यस्तवरूप काव्य. ३ विष्णुस्तुतिरूप काव्य. ४ यमुनास्तुतिरूप काव्य. ५ लक्ष्मीचे स्तोत्र आहे. ६ नवाब आसफखाननामक कोणा मुसलमान सरदाराचें यांत वर्णन आहे. हा ग्रंथ संपूर्ण उपलब्ध नाही. ७ शहाजहानाचा मुलगा दाराशाह याची यांत स्तुति आहे. ८ कामरूप देशाचा राजा प्राणनारायण याचे यांत वर्णन आहे. ९हा गद्यग्रंथ उपलब्ध नाहीं. १० ध्वनिकाव्य. १९ शब्दचमत्कारप्रधान काव्य.