पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/103

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. शान्तविलास. लतावलिशतावृतो मधुरया रुचा संभृतो ममाशु हरतु अमानतितरां तमालद्रुमः ॥४॥ छाया. कलिन्दतनयातटावरिल कॉनने भावी लतीवलिविभूषणी रुचिर फार ज्याची छवी । सदा भ्रमँति जे पथीं, शमविा त्या जनांचे श्रम मम श्रमहि संहरो त्वरित तो तमालद्रुम ।। ४ ।। मूल. वाचा निर्मलया सुधामधुरया यां नाथ शिक्षामदास्तां स्वप्नेऽपि न संस्मराम्यहमहंभावावृतो निस्वपः। इत्यागःशतशालिनं पुनरपि स्वीयेषु मां बिभ्रतस्त्वत्तो नास्ति दयानिधि यदुपते मत्तो न मत्तोऽपरः॥५॥ Om छाया. केला प्रेमळ आणि गोड वचनीं त्वां बोध, बापा, खरें लज्जाहीन मदान्ध मी परि तया स्वप्नांतही न स्मरें ! ऐशी पापेशतें करी तरि मला तूं मानिशी आपुला बना होशी त्वत्सम तूं दयाळु, मजसा मी मत, देवेश्वराँ! ॥५॥ २ यमुनेच्या तीरावरील. २ अरण्यें. ३ दैदीप्यमान किंवा प्रभायुक्त करितो. याला 'जो' (तमालद्रुम) हा अध्याहृत कर्ता. ४ अनेक लतारूप मोठ्या अलंकारांनी.५ ज्या तमालद्रुमाची. ६ कांति. ७ भटकतात; येरझारा करतात. *( जन्ममरणरूप ) मार्गामध्ये. दूर किंवा शांत करितो. 'जो' (तमालद्रम) हा याचा अध्याहृत कर्ता. 'जे सदा पथीं भ्रमति त्या जनांचे अम ( जो तमालद्रुम) शमवि, 'असा अन्वय. ८ दूर करो. ९ अनिर्वचनीय तमालवृक्ष. १० (हे) खरें (आहे). ११ त्या बोधाला. १२ शेंकडों पा. १३ स्वकीय. १४ तुझ्यासारखा. १५ माझ्यासारखा. १६ माजलेला. १७ देवाधिदेवा!