पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. कालीन होते असें वर दिलेल्या हकीकतीवरून लक्ष्यांत येईल. भट्टोजिदीक्षित आणि अप्पयदीक्षित यांच्याशी जगन्नाथाचा विरोध होता असे दिसते. कारण भट्टोजिदीक्षितहत मनोरमाग्रंथावर मनोरमाकुचमर्दन नांवाचा एक टीकाग्रंथ जगन्नाथाने केला. त्या ग्रंथांत त्याने भट्टोजिदीक्षितांचे अनेक ठिकाणी खण्डन केलें. अप्पयदीक्षित यांच्या चित्रमीमांसानामक ग्रंथावर जगन्नाथाने चित्रमीमांसाखंडन या नांवाचा ग्रंथ लिहिला. यांत त्याने दीक्षितांचे दोष अनेक स्थली व्यक्त केले. शिवाय रसगंगाधरग्रंथांतही जगन्नाथानें अप्पयदीक्षितांची मतें तिरस्कारपूर्वक खोडून टाकिली. अप्पयदीक्षित अत्यंत धर्मनिष्ठ व कर्मट होते; व जगन्नाथ आचारभ्रष्ट होता; शिवाय जगन्नाथाला यवनीसंतर्गदोषासंबंधाने बहिष्कार घालण्यांत काशीक्षेत्रांतील ब्रह्मवृंदामध्ये अप्पयाक्षित पुढारी होते. या कारणामुळे जगन्नाथाने रागावून त्या पण्डिताचा आपल्या ग्रंथांत अनेक स्थली अधिक्षेप केला असे कित्येक जुन्या विद्वानांच्या तोंडून आगीं ऐकले आहे. अप्पयदीक्षितांचे वेदान्त, अलंकार, न्याय, धर्म इत्यादि शास्त्रीय विषयांवर अनेक ग्रंथ आहेत. त्यांत कुवलयानंद आणि चित्रमीमांसा हे दोन अलंकारग्रंथ विशेष प्रचलित आहेत. दीक्षितांचे वय मृत्युतमयीं नव्वद वर्षांचे होते.' रसगंगाधर, मनोरमाकुचमर्दन, आणि चित्रमीमांताखण्डन या ग्रंथांमध्ये जगन्नाथाची सूक्ष्म व विशद बुद्धि, प्रतिपक्षा १ कविचरित्र. २ हा साहित्यावरचा विद्वन्मान्य ग्रंथ आहे. ३ भट्टोजिदीक्षितकृत मनोरमेचें यांत खण्डन केले आहे. ४ अप्पयदीक्षितकत चित्रमीमांसा नामक एक अलंकारग्रंथ आहे, त्यांतले दोष यांत दाखविले आहेत.