पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यांबद्दल त्यांचे कौतुक करणे, म्हणजे महाराज - धानीचे सामग्रयानें चित्र चितारणाऱ्या चिताऱ्याने गद्दन अरण्यें, वन्य श्वापदें, साहरासारखी वाळवंटे किंवा एकमेकांत घोटाळणारे लहान मोठे बोळ हीं चितारलीं नाहींत, म्हणून त्यांचे कौतुक करण्या- सारखेच तत्रदृष्टीला भासतें. " • आतां मोरोपंताच्या कृष्ण विजयाच्याकडे वळू. मोरोपताच्या महाभारतांत संकोच विस्तार कसा काय झाला आहे याविषयीं स्थूल विवेचन आतां पर्यंत दिलें आहे. आतां कांहीं विशिष्ट उदाहरणे घेऊन मोरोपंताच्या फरकांची समर्पकता व त्यांव- रून मोरोपंतांचे मूलग्रंथवैगुण्यविषयक मत लक्षांत घेऊ. मोरोपंताच्या महाभारताचें जसें तौलनिक परी- क्षण झालें आहे तसेंच त्यांच्या बृहद्दशमाचें म्हणजे कृष्णविजयाचे देखील वामन दाजी ओकांनीं केलें आहे. व त्यांनीं भाषांतरकारानें मूळापासून केलेले फरक आपल्या आवृत्तीच्या टीपांत दाखविलेले आहेत. त्या टीपांच्या साहाय्याने पुढील विवेचन केले आहे. (१) मथुरेवर जरासंघ स्वारी करावयास येतो पण पराभव होऊन परत जातो जातांना त्यास “विजनवनीं तप करावें" किंवा भूमिधर गुहेत दडावें अशी इच्छा उत्पन्न होते. तथापि तो पुढे तसल्या इच्छेपासून परावृत होऊन गुन्हा कार्यास लागतो, असा कथाभाग आहे; तर पंताच्या मनानें त्यास पुन्हां कार्यप्रवृत्त होण्यास कोणी तरी प्रेरक झालें पाहिजे असें वाटलें, म्हणून पंत जरा संघास वनमार्गी कोणी तरी राजे भेटवितात. ते राजे जरासंधा- हो सावध नृपरत्ना पुनरपि विजयार्थ सिद्ध हो करी यत्ना | आम्ही सर्व सहाय, प्रभु तूं, यादव वराक ते किती काय? ||२९|| कोण पराभव नाहीं पावत दें नीतिबुद्धिच्या भवनाही । आणावें स्वमनींच, व्याकुळ होतात पात्रतां श्रम नीच ॥ ३० ॥ ८३ भाषांतरकार आणि स्वां मूळ परीक्षण येणेप्रमाणे उपदेश करतात असे मोरोपंतांनी स्वेच्छेनें वर्णिले आहे. (२) जेव्हां रुक्मिणीकडून ब्राह्मण कृष्णाकडे जातो तेव्हां आपण काय कामासाठी आला हा प्रश्न विचारतांना कृष्णाच्या व्याख्यानाचा मोरो- पंतांनी संकोच केला आहे. (३) जरासंधानें रामकृष्ण ज्या पर्वतावर होते श्या पर्वताभोंवती लाकडें जमवून आग लावून दिली त्यावेळेस रामकृष्णांच्या विषयीं जो द्वेष जरासंधाच्या मनांत होता तो व्यक्त करण्यासाठी मूळापेक्षां वर्णन जास्त विस्तृत केले आहे. (४) कृष्णाकडे संदेश पोचवून ब्राह्मण रुक्मिी- णीस भेटण्यासाठी आला तेव्हां त्यास अरुणाची आणि कृष्णास सूर्याची व रुक्मिणीस नलिनीची उपमा दिली आहे. ही उपमा साधीच आहे पण हा प्रसंग मोरोपंताच्या दृष्टीनें अधिक काव्ययुक्त वर्णन करण्याजोगा होता व या प्रसंगीं मूळ ग्रंथानें तशी उपमा दिली नाहीं हें व्यंग आहे असे मोरो- पंतास वाटत असावें. (५) कृष्ण रुक्मिणीला रथांत घेऊल जातो, विदर्भसैन्य युद्धतत्पर होतें अशा प्रसंगी कृष्ण रुक्मिणीस धीर उत्पन्न होण्यासाठी आपल्या सैन्याचे शौर्य व मोठेपणा सविस्तर वर्णन करतो हे सविस्तर वर्णन मुळांत नाहीं म्हणून मोरो- पंतांनी वाढविलें आहे. (६) रुक्मिणीच्या उदरीं मदन जन्मला, त्या प्रद्युम्नास शंबर आकाशमार्गानें जन्मल्याबरोवर उचलून नेतो. हा प्रसंग उपमागौरवास लायक आहे असें मोरोपंतास वाटून त्यांनी या प्रसंगी " जैसा की मृगशावकास पळवी भक्षावया लांडगा " अशी उपमा दिली आहे. म्हणजे याप्रसंगी उपमा खर्ची न घालण्यांत मूळ ग्रंथकारानें चूक केली असेंच मोरोपंतास वाटत होतें. (७) जेथें मूल ग्रंथांतील वर्णन मोरोपंताच्या वर्णनापुढे अगदी फिक्के वाटतें असें एक स्थ