पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण संवाद (अध्याय ११-१५) अनुगीता (११-१२, - ब्राह्मणगीता, (२०-३४) व गुरुशिष्यसंवाद (३५) १५) या गहन विषयांनी ४० अध्याय व्यापिले आहेत. तेव्हां तेवढे अध्याय सोडून बाकीच्या ५२ अध्यायांवर पंतांनी चांगलीच विस्तृत टीका केली आहे. मूळांतील वर्णन साधें, बोजड व पाल्हाळिक असते; परंतु मोरोपंतांचे वर्णन खुबी दार अलंकारिक, टापटिपीचें व मोजक्या शब्दांत विपुल अर्थ सांठून राहील अशा थाटाचें असतें, ही गोष्ट लक्षांत घेतली म्हणजे मोरोपंतांनीं केलेल्या विस्ताराचें खरें स्वरूप लक्षांत येईल. नुसत्या पद्यसंख्यांवरून संक्षेपविस्ताराविषयीं कैलेले हिशोब बरोबर होणार नाहींत. कित्येक वेळां एका मोरोपंतांनीं गीतेचें संस्कृतांत भाषांतर करावयाचे म्हटले तर अनुष्टुभ् वृत्ताचे महाभार- तांतीळ रचनापद्धतीचे तीनतीन चारचार श्लोक बनवावे लागतील. तेव्हां पद्यसंख्येवरूनच संक्षेप - विस्ताराविषयीं केलेली विधाने अनेक वेळां भ्रामक ठरण्याचा संभव आहे, हे उघड आहे. आश्रमवासिक धर्मः-मोरोपंताच्या या पर्वाचे संपादन करण्याचे काम बाळकृष्ण अनंत भिडे व दत्तात्रेय केशव जोशी यांनी केलें. ते या पर्वा- विषयी लिहितात "मूळ व्यासकृत महाभारतांत या पत्रात एकंदर ३९ अन्याय आहेत. यांत कोठेंहि उपाख्यानांच्या व तात्त्विक विषयांवरील लांबच लांब ऊहापोहाच्या रूपानें विषयांतर झालेलें नसून, धृतराष्ट्राच्या चरित्रांतील वरील कलमांत निर्दिष्ट केलेला कथाभाग विस्तारश: उतरलेला आहे. या पर्वावरील पंतांची ही सप्ताध्यायात्मक मराठी टीका चांगली विस्तृत आहे, व त्यांनी मूळांतील कथाभाग कोठेंहि वगळलेला नाहीं. पर्वातील दरोबस्त कथाभाग धृतराष्ट्रपांडवांच्या प्रत्यक्ष जीवनचरित्रांतीलच असल्यामुळे, पंतांनी या ठिकाणी आपली संक्षेपाची कातर न चाल- 'वेतां, विस्तारकलेचा स्वतंत्रतेने प्रयोग केला आहे.” मोरोपती महाभारताच्या शेवटच्या तीन पर्वोचें प्रसिद्धीकरण करतांना संपादक ( भिडे व जोशी) थोडेसे असंतुष्ट होऊन म्हणतात:- "पंतांच्या संक्षेप कौशल्याचे आजपर्यंत टीका- रांनी अनेक वेळा बरेच गोडवे गाइले आहेत. परंतु आख्यानामागून आख्यानांचे निवळ नाम- निर्देश करून त्यांना फांटा देणे यांत कौशल्य कोठें आहे, हे आम्हांस समजत नाहीं. पांडव- प्रताप पंतांनी अगदीं विस्तृतपणे वर्णिला आहे. मधून मधून एखादें हरिदासांस उपयोगी असे चटकदार आख्यान आढळल्यास त्याचाहि त्यांन आदर करून विस्तार केलेला आढळतो. नल- दमयंतीकथानक, रामायणकथा, उत्तंकाख्यान, दुर्वासमिक्षा वगैरे कथानके या तऱ्हेचीं आहेत. पांडवचरित्राशीं निकट संबंध असणारी 'विदुर- नीति', 'कणिक नीति', 'कृष्णनीति उर्फ भगव- गीता', भीष्मानी केलेले 'धर्मकथन', 'उपगीता', 'अनुगीता, वगैरे सर्व प्रकरणें हरिदासोपयोगी आख्यानें सजविण्याच्या कामी नालायक व काव्य- सरणीशी विसंगत म्हणून सोडून दिली आहेत,हेंहि त्यांच्या मूळ धोरणाला धरूनच आहे. प्रसंग प्रस्तुत असतांहि पंतांनी कित्येक ठिकाणी ग्रंथविस्ता- राला भिऊन संक्षेप केलेला आढळतो. आणि अशा स्थळी ग्रंथसंक्षेप करण्याची त्यांची पद्धत जरा मजेची आहे. उदाहरणार्थ, विराटपर्वात क द्रोणाचार्यांची निंदा करून निष्कारण उप केलेला आहे. त्या वेळचें कर्णाचें आत्मप्रौढीयुक्त गरलकटुभाषण, पांच सहा आर्यात मोठ्या सफा ईनें वठवून, पुढे पंत म्हणतात:- खळकृत गुरुनिंदेतें वर्गील कधीं न विस्तरे सुकवी ॥ कीं ती श्रीगुरुभक्तिप्रेमामृत पादपांकुरा सुकवी ॥९॥ पण पांडवचरित्राच्या अखंड सूत्राच्या रोखानें काव्यमार्ग आक्रमणाऱ्या पंतांनी आजूबाजूची विस्तीर्ण स्थळे व गहनतत्त्वाच्या गुहा हीं टाळलीं,