पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काम्यपरीक्षण कै. वामन दाजी ओक दाखवून देतात. तें म्हटलें म्हणजे जेव्हां प्रद्युम्नाची आणि रुक्मिणीची भेट होते तो प्रसंग होय. मोरोपंतांनी या प्रसंगीं मूळ अगदींच बाजूला ठेवून आपल्या अभिरुचीप्रमाणे वर्णन केले आहे. हा प्रसंग पुढीलप्रमाणे मोरो- पंत वर्णितात:- रुक्मिणी म्हणे " हा कोण श्री यदुपतिसम श्री नरमणी गमे या पुत्रास प्रसवलि नराची न रमणी ॥ अशा रत्नाची जी खनि जनि तिचा धन्य कुसवा स्वयें याचें वृत्त प्रियसाखे पुता गे न पुसवा ॥ या लावण्यांधीला अनुसरल असे जी अनन्या नईचें । पत्नीचें भाग्य लोकीं अतुल सुकृत जे मोजवे तें न ईचें ॥ ती धन्य होय ऐसे विमळ उपजले रत्न ऐशा कुशीला । न स्पर्शची तुला बा रुचिरतरतनो दृष्टि जी की कुशीला ॥ माझाही पहिला अनिर्दश शिशू नेला स्वगेहांतुनी दैवें हारपला अन सुमणी जैसा पडे हातुनी । तो जीवंत असेल शंकरदयाघात्री निजांकी जरी वाटे बुद्धिस येवढाच सुवर्ये झाला असावा तरी ॥ याच्यापुढे आणखी चार श्लोकांत रुक्मिणीचें भाषण पुरें होतें. एवंच हा प्रसंग सविस्तर वर्णन करण्याजोगा आहे असें मोरोपंतास वाटलें.. रुक्मिणीच्या मनाला याप्रसंगीं जें काय वाटलें, किंबहुना जी शंका उत्पन्न झाली ती निवारण करण्यासाठी कोणी तरी यावयासच पाहिजे होता. der कथेत आला. कृष्ण "विश्वसाक्षी" होता त्यास सर्व "कळ न परि तो वदे." तेव्हां नारद आला आणि त्यानें सत्य सांगितलें असें मूळांत वर्णन आहे. पण मोरोपंताच्या मतें नारदाचे, • सविस्तर वर्णन हवें होतें; तो नारद होता एवढेच ८४ सांगणे पुरेसें नव्हतें म्हणून मोरोपंतांनी "जो लोकत्रितयीं फिरे" वगैरे वर्णन केले आहे. कृष्णविजयाच्या उत्तरातील पहिल्या थोडया पानांत हीं फरकाची उदाहरणें सांपडतात, व असे फरक जागोजाग दिसत आहेत. आज आप- णांस वाचतांना असें वाटतें कीं, मोरोपतांनी हे केलेले फरक योग्य आहेत आणि यावरून मोरो- पंतांस मूळ ग्रंथांतील अनेक स्थलांची सौंदर्य- दृष्टीनें अपूर्णता भासत होती हैं उघड आहे मोरोपंताचें काम केवळ मूळ ठिकाणची अपूर्णता शोधावयाची एवढेच नव्हते. ती अपूर्ण त्यांनी वारंवार दाखवून दिली असती तर तो भागवताचें काव्यदृष्टीनें परीक्षण करणारा ग्रंथच झाला असता. पण मोरोपंताचें कार्य केवळ मूलकृतिपरीक्षण नसून नवकृति- करण हें होतें. काव्यपरीक्षणाच्या पुढची कृति त्यास करावयाची होती. कल्पना करा के एका इमारतीप्रमाणें दुसरी एक इमारत बांधली आहे. दुसरी इमारत बांधतांना स्थूलपणें जरी दोन्ही सारख्याच दिसल्या तरी पहिली व नंतरची या दोन्ही इमारतीत पुष्कळ फरक आहे. अशा वेळेस दुसरी इमारत बांधणाऱ्या मनुष्यास पहिल्या इमा रतीवर केवळ टीकाच करावयाची नसते तर त्याच्या दृष्टीने जे दोष असतील ते नवीन इमा रतींत टाळावयाचे असतात. या एका दृष्टीनें तो काम करतांना आपले वास्तुपरीक्षणशास्त्र वापरीत असतो. तो प्रत्येक फरक करतो तो मूळांतील दोष आहे असें वाटूनच करीत नसतो, तर त्यास निराळ्या गरजांची जाणीव असते म्हणून तो कांहीं फरक करतो तर कांहीं प्रत्यक्ष सौंदर्यविषयक सुधारणाच असतात. भाषां- तरकरार्चेहि तसेंच आहे. तो कांही फरक निराळ्या जनतेला विषय समजावून बाव- याचा म्हणून करतो तर कांहीं फरक काव्य अधिक सुंदर करण्यासाठी करतो. आणि यासाठी