पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण सुजनानेंच हाती लेखणी धरावी. वैदर्भीविवा - हाची कथा मूळांत एकाच साध्या श्लोकांत आट पली आहे, पण प्रस्तुत ग्रंथ कृष्णचरित्रपर होय हैं तारतम्य जाणून पंतांनी यथ तिचा फार • मार्मिक- पणानें विस्तार केला आहे; व कृष्णविवाहाची गोष्ट उघडच रुक्मिणीला अधिक खरेपणाने स्वानुभवाच्या धिटाईनें व उल्हासाने सांगतां येईल हा भाव मनांत आणून पंतांनी ती रुक्मिणी कडूनच वदविली आहे. रुक्मिणी आपल्या विश्वा साच्या मैत्रीणीच्या मंडळांत स्त्रीस्वभावाला अनु- सरून अशा साध्या गोडसरस वाणीनें तो सांगत आहे.” ही कथा येथे देण्याचे कारण नाहीं. येथे दाखवावयाची गोष्ट हीच की पंतांनी येथे मूळ ग्रंथभागावर मत व्यक्त केले आहे. मोरोपंतांस असे वाटले की प्रस्तुत प्रसंगाचा उपयोग कवीस कसा करून घेतां येईल याविषयीं मूळ ग्रंथकारास चांगली कल्पना आली नाहीं. येथे अर्थात मोरो- पंतांनी मूळ ग्रंथांतील भागावर आपले मत त्या ग्रंथाची अनुकृति करण्याचें नाकारून व्यक्त केलें आहे. आपणांस भाषांतरांपासून काव्यपरीक्षण काढण्यास असलींच स्थळे शोधली पाहिजेत. मोरोपंतांनीं रूपांतर करतांना जे फरक केले त्यांचा विचार करतांना प्रथम मोरोपंताच्या महा भारतीय वृत्तीचा विचार केला पाहिजे. ८० महाभारत हा ग्रंथ असा आहे की तो पूर्वी बराच लहान होता आणि त्यांत अनेक गोष्टी पुढे घातल्या गेल्या जाऊन ग्रंथविस्तार झाला. निर- निराळ्या लोकांनी आपापल्या हेतूसाठीं महाभार- तांत आपल्या इच्छेला येईल तें घुसडावे हा प्रकार अनेक शतकें चालू होता. त्यामुळे महाभारत हा ग्रंथ तीनदां जरी संपादिला गेला तरी मूळ कथाभाग आणि आंत घालावयाचीं आख्याने व उपाख्यानें यांच्यामध्ये वर्णनकथनाच्या बाबतींत प्रमाणतस्या- वलंबन राहिलें नाहीं. भाषांतरकारापुढें हें वाङ्मय एकदमच पुढे राहिलें म्हणजे भाषांतरकारांला प्रतिकृति करतांना प्रत्येक कथाभागाच्या लांबी- रुंदीविषयी विचारच केला पाहिजे. भाषांतरकाराला आपला ग्रंथ आकर्षक करावयाचा असतो. वाचक त्याचे परीक्षक असतात. ते मूळ ग्रंथाची प्रतिकृति मूळच्या प्रमाणांत झाली की नाहीं हें न पहातां आकर्षक झाली किंवा नाहीं हेंच पहाणार. मोरो- पंतास यासाठी भाषांतर आकर्षक करण्याची जरूर होती; व म्हणून मोरोपंतांनी सबंध भार- ताचा गोषवारा केला. पण त्यांनी प्रत्येक भागांत संक्षेप सारखाच दिला नाहीं. मोरोपंत संक्षेप सारखाच देत गेले असते तर त्यांस केवळ भाषा- तरकार म्हणतां आले असतें तथापि त्यांनी संक्षेप निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या प्रमाणाने दिला आहे तर कित्येक ठिकाणी विस्तारहि केला आहे.. आपल्या बदलांनी मोरोपंत आपले महाभारताचें स्वरूप कसे असावे याविषयी मत व्यक्त करतात. काव्यसंग्रहाच्या संपादकांनी मोरोपंतांच्या महा- भारतांतील निरनिराळ्या भागांचा संक्षेप मूळाशी ताडून पाहिला आहे. तो ताडून पहातांना त्यांनी मोरोपंत हा केवळ भाषांतरकार नव्हता हेंच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठ त्यांनी चर्चेत मोरोपंतांनी नवीन अलंकार कोणते घातले वगैरे गोष्ट चाहि उहापोह केला आहे. आपणांस विशेष लक्ष देण्याजोगा भाग म्हटला म्हणजे मूळ ग्रंथाच्या मांडणीत कोठें संक्षेप हवा होता, कोठें विस्तार हवा होता याविष- यीचें मोरोपंतांचे त्यांच्या भाषांतरावरून व्यक्त होणारे मत हा आहे आणि यासाठी काव्यसंग्रह- कारांच्या चर्चेतील तेवढ्याच भागाकडे आपण लक्ष देऊ. संक्षेपविस्तारविषयक विवेचन काव्य- संग्रहकारांनी महाभारताच्या प्रत्येक भागावर केलेलें नाहीं. शल्यपर्व: - या पर्वाचा रा. नारायण चिंतामण केळकर यांनी वामन दाजी ओकांनी घालून दिलेल्या तौलनिक पद्धतीने चांगला अभ्यास केला आणि त्या अभ्यासाचें फल त्यांनी आपल्या मोरोपताच्या शल्यपर्वाच्या प्रस्तावनेत दिले आहे. त्यांनी मोरोपताचा संक्षेप विस्तार दाखविण्या- साठीं जें शल्यपर्वाचे मूळाशी तुलना करणारे कोष्टक केलें आहे तें पुढे देतो.