पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण ७८ " घेऊन दाखविलें आहे; पुढे गुंजीकर असें दाख- मारण्यापूर्वी येथे हे सांगितलें पाहिजे कीं, झाडून साऱ्या संस्कृत कवींनीं हा गुन्हा केला आहे.' रघुवंशांत रघूचा दिग्विजय वर्णन करतांना कालि- दास स्वकीय काळांतली हिंदुस्थानची राजकीय स्थिति वर्णितो आणि पारसीकांनां जिंकल्याचें सांगतो, व ती देखील भूगोलविद्या बृहत्कथेंतून घेतलेली दिसते. कबीचा कालविपर्यास इति- हाससंशोधक इतका गृहीत धरतात कीं कवि जे वर्णितो तें वर्ण्यकालाचे चित्र न समजतां कवि कालाचेंच समजावयाचें असें ठरलें आहे. मोरोपंताची कविता पेशवाईच्या अंतिमकाला पासून महाराष्ट्रीय सुशिक्षित वर्गात बरीच प्रिय झाली असल्यामुळे जवळजवळ अव्वल इंग्रजीच्या काळापासून तिच्यावर विचार होत आहे. आणि त्यावेळेस जे वादविवाद झाले त्या वादविवादांत बरीच मंडळी गुंतली गेली. मोरोपंताची कविता ही प्रसिद्ध लेखमाला निबंरमात चालू असतां विविधज्ञानविस्तारांत पत्युत्यरात्मक लेखमाला सुरू होती. तिचे लेखक कै. रामचंद्र भिकाजी गुंजी• कर होते असें समजतें. त्यावेळेस मोरोपंताची व इतर मराठी कवींची कविता भाषांतरात्मक कितपत आहे आणि स्वतंत्र कितपत आहे हा वादाचा मुख्य विषय होता. त्यावेळेस जो गुंजी करानी उत्तरपक्ष केला त्यांतील कांही भाग आप- णांस विचारार्ह आहे. विविधज्ञानविस्ताराच्या १८८० सालच्या मे- जून-जुलैच्या अंकांत गुंजीकरांनी असे दाखविलें आहे की मराठी कवींनीं कथासूत्रापेक्षां बरेंच जास्त संस्कृत ग्रंथकारांपासून घेतलें आहे तरी त्यांच्या कृतीला भाषांतर म्हणतां येणार नाहीं. कारण त्यांनां भाषांतर करून यमकात्मक रचना करणे साधलें नसतें. तें केवळ भाषांतर नाहींच. संस्कृत ग्रंथांतील अनुक्रम, विचार, कल्पना व अलंकार हीं अनेक ठिकाणीं घेतलीं आहेत पण त्यांत शब्दान्शब्द भाषांतर नाहीं असेंहि अनेक उतारे वितात कीं मोरोपंतांनी सप्तशती सारख्या पुस्त- काचें देखील भाषांतर करतांना नवीन अर्थालंकार घातले आहेत, मूळ ग्रंथांत कांहीं एक आधार नसतां पंतांनीं कोठें कोठें कथानकाचा संदर्भ रहावा, संगति बिघडूं नये म्हणून स्वतःचा स्वतंत्र मजकूरहि घातला आहे. कांहीं ठिकाणीं मूळ ग्रंथांत दिसून येणाऱ्या विस्तारभीरुत्वा चाहि त्याग केला आहे. पण भगवद्गीतेसारख्या ग्रंथाचें मात्र भाषांतरच केलें आहे" गीतेशिवाय दुसरें भाषांतर म्हटले म्हणजे शंकराचार्यकृत प्रश्नोत्तरमालिकेचें आहे. व पंतांनी " रामगीते " चेंहि भाषांतर केलें आहे असें आमच्या एका मित्राचें म्हणणें आहे. ह्या तीन ग्रंथांशिवाय पंतांचा भाषांतररूप ग्रंथ आमच्या पाहण्यांत नाहीं. पंतानी “गीतेचें" भाषांतर कां केलें या गोष्टीची उपपती दुरूह आहे असें नाहीं. ह्या अध्यात्मविषयक ग्रंथांत शब्दालंकारास व अर्थालंकारास मुळींच अव- काश नाहीं. तेव्हां पंतांस भाषांतर करणे हाच मार्ग पसंत पडला असावा. सप्तशतीमध्ये कथा- नकें अमल्यामुळे भाषांतर न करतां पंतांनी आपल्या एकंदर काव्यसरणीचेच अनुकरण केले" गुंजीकरांचें हें विवरण आपणांस निराळ्याच तऱ्हेने विचार करण्याजे, गे आहे. या लेखांत मोरों- . पंतांनी मूलकवीच्या लेखाचें भाषांतर कोठें करावें आणि आपलें कवितास्वातंत्र्य कोठें दाखवावें यावि- षयीं आपली वृत्ति प्रगट केली आहे ती सामान्य- पणें अशी मांडतां येईल. जेथें कथासूत्रास प्राधान्य- असेल तेथें पाहिजे तितकें स्वातंत्र्य घ्यावें पग जेथें विचारसूत्राला प्राधान्य असेल तेथें विचाराचा अपकर्ष होऊ नये म्हणून आपण आपली यम- काभिरुचि देखील आडवी येऊ देऊ नये. याव- रून मोरोपंत आपल्या भाषांतरांत मूलार्थाच्या रक्ष- णासाठी मोठी काळजी घेत होता असें दिसून येते.