पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानकोश - प्रस्तावनाखंड ( विभाग १ - ५ : ) किंमत रु. ५५ यांतील प्रत्येक भाग स्वतंत्रहि घेतां येतो, विभाग पहिला "हिंदुस्थान आणि जग" यांत गेल्या दोन हजार वर्षात हिंदुस्थानचा आपली संस्कृति जगज्जेत्री करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नाचा यूरोप, आफ्रिका, चीन, जपान व दक्षिण महासागरांतील बेटें यांवर झालेला परिणाम वर्णन केला आहे. बाह्य संस्कृतींतून भारतीयांनी काय घेतले याची सविस्तर माहिती दिली आहे. शिवाय भारतवर्षाच्या व जगाच्या आणि एकंदर सामाजिक इतिहासापासून समाज शास्त्रीय नियम काय निघतात आणि ते नियम कार्य करीत राहिले असतां समाजाची भवित- व्यता काय, यावर प्रचंड माहितीच्या साहाय्यानें अत्यंत स्पष्ट व निर्भीडपणे विचार व्यक्त केले आहेत. किरकोक किं. रु. १२. विभाग दुसरा " वेदविद्या" हा अत्यंत अपूर्व माहितीनें भरला आहे. यांत चारहि वेदांचें म्हणजे संहिता, ब्राह्मर्णे, आरण्यकें, उपनिषदें, यांतील माहितीचे, विचारांचे व कथांचें वर्णन केले आहे. श्रीतधर्म म्हणजे यज्ञसंस्था व वेदकालीन देवता यांचें अत्यंत सूक्ष्म वर्णन आलें असून यज्ञसंस्थेच्या भिन्नत्वामुळे उत्पन्न झालेल्या वैदिक वाङ्मयाच्या निरनिराळ्या शाखांमध्ये काय फरक उत्पन्न झाला त्याची कोष्टकेंहि दिलीं आहेत. पौराणिक कथांचें वैदिक पूर्वस्वरूप दिलें आहे आणि वेदकालीन आचार्यवर्गातील चळ- वळी व त्यांमुळे ब्राह्मण जातीची उत्पत्ति व विभागणी कशी काय झाली हें स्पष्ट केलें आहे. ज्ञान आजपर्यंत गूढ राहिलें होतें, तें अनेक जें विद्वानांच्या साहाय्याने सार्वजनिक केले आहे. किं. रु. १३. जगाचा इतिहास बुद्धपूर्व जग व बुद्धोत्तरजग वि. ३ व ४ या भागांत भारतीयांच्या अत्यंत प्राचीन इति- हासास साधन जे वेद या वेदांचें सूक्ष्म पृथक्करण करून अत्यंत प्राचीनकालच्या स्थितीचें जितकें व्यापक वर्णन देतां येणें शक्य आहे तिककें दिलें आहे. त्यांत आलेल्या माहितीने लोकांची वेदकालीन इतिहासाची कल्पना अगदीं बदलून जाणार आहे. हिंदुस्थानच्या अत्यंत प्राचीन काळांत त्यांचा असुर, ग्रीक, रोमन, इराणी या सर्व संस्कृतींशी संबंध येतो तो सर्व भाग या ग्रंथांत दिला आहे. आणि अर्वाचीन काळांत ब्रिटिश राज्य होऊन स्वातंत्र्याची परिसमाप्ति होईपर्यंत, महंमदी जग व यूरोपांतील अनेक राष्ट्र् यांशी निकट संबंध आला त्याचा इतिहास “बुद्धोत्तरजग" या ग्रंथांत दिला आहे. किंमत रु. १५ व १३. विभाग पांचवा "विज्ञानेतिहास" या विभागांत प्राथमिक व प्रौढ स्वरूपाच्या बहुतेक शास्त्रांच्या भारतांतील व पाश्चात्त्य देशां- तील वाढीचा इतिहास दिला आहे. म्हणजे लेख- नपद्धति, संख्यालेखन आणि कालगणना या प्रार्थ- मिक स्वरूपाच्या ज्ञानाच्या व नंतर छंद, संगीत, निरुक्त, व्याकरण, मीमांसा, वैद्यक, ज्योतिष, रसा- यन, पदार्थविज्ञान, गणितशास्त्र, भूस्तरशास्त्र, जीवशास्त्रे इत्यादि शास्त्रांच्या इतिहासाचा परामर्ष घेतला आहे. किंमत रु. ११. स्यानेजर ज्ञानकोश प्रेस पुर्णे