पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पृ. १८, कानडा विठ्ठल ग्रंथपूरक टिप्पण विठ्ठल ही कर्नाटकीय देवता म्हणून महा- राष्ट्रांत मानली गेली कीं नाहीं हा प्रश्न आहे. कनडा या शब्दाचा अर्थ अगम्य असा अर्थ प्रो. दांडेकरयांनीं दाखविला आहे. पण दोनदां कानडा शब्द आला म्हणजे दुसऱ्यानदां जो कानडा शब्द येतो त्याचा अर्थ कर्नाटकीय असा धरण्यास हरकत नाहीं असें सांगितलें आहे. पण त्या विधानाविषयीं पूर्णपणे खात्री देतां येत नाहीं. अमृतराय कवचें “कानुड्यानें माझें मन मोहिलें" हें पद काव्यसंग्रहांत (ग्रंथांक २६ पुरवणी पृ. १४) छापलें आहे. हेंच पद पुष्कळांनी वीस पंचवीस वर्षापूर्वी बायकांच्या तोंडी ऐकले असेल. मी ऐकलें त्यांत"कान्हुड्यानें माझें मन मोहिलें" असें ऐकलें होतें. तर कान्हुडा या शब्दापासून कानडा असा शब्द आला असणें शक्य आहे. कान्दु हैं कन्ह म्हणजे कृष्ण याचेंच स्वरूप आहे. पूर्वी प्रथमा एकवचनी उकारांत असे त्यामुळें जानु, कान्हु हीं नांवें ज्ञान व कृष्ण या अर्थानें प्रचारांत आलीं व तीं अजून चालूच आहेत. विठ्ठल या शब्दाची व्युत्पत्ति देतांना कै. राजवाडे यांनी विठ्ठल हैं विष्णु या शब्दाचें कर्नाटकी रूप आहे असें एकदां मांडले होते पण पुढे तें मत त्यांनी सोडून देऊन विटेवर उभा रहणारा तो विठ्ठल असें स्पष्टी- करण केले आहे. पृष्ठ ३२, रकाना २ येथें गळालेला मजकूर मुक्तेश्वराच्या ओव्या दिल्यानंतर एकदम राम- दासांच्या दासबोधांतील ओव्या येतात. त्या दोहोंमध्ये खालील मजकूर गळाला आहे- "हा मुक्तेश्वराचा ताशेरा विष्णुदास नामा या कवीवर आहे असें रा. भावे आपल्या महाराष्ट्र सारस्वतांत दाखवितात. याच काळांत रामदासांनी मराठी भाषेत ग्रंथ- समर्थन ग्रंथ लिहिण्याचे समर्थन वारंवार केले. आहे. तें समर्थन दाखविणारा एकच उतारा पुढे देतों”