पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना त्मक, किंवा ऐतिहासिक टीकाग्रंथहि वाचण्यांत आले व त्यामुळे कांहीं वाङ्मय पुन्हा वाचलें गेलें. तें वाचतांना असे वाटू लागले की, मराठी कवींच्या ग्रंथांचा ज्या अनेक दिशांनी अभ्यास व्हावयास पाहिजे, त्यांपैकीं बन्याच दिशांनी अभ्यास व्हावयाचा आहे. तथापि हा व पूर्वीचा झालेला अभ्यास प्रस्तुत पुस्तक लिहिण्यास प्रेरक झाला नाहीं. महाराष्ट्रीय काव्यपरीक्षणाच्या इतिहासाचा हा पूर्वभाग आहे. यांत पेशवाई समाप्त होण्या- पूर्वीच्या कालांतील ग्रंथाभिरुचीचें आणि काव्य- परीक्षणाचें विवरण आहे. अर्वाचीन काव्यपुरी- क्षणाचा एक स्वतंत्र ग्रंथ पुढें प्रसिद्ध होईल. अमेरिकेस जाण्याच्यापूर्वी म्हणजे १९०६ पूर्वी मराठी कवींच्या ग्रंथांचे बरेंच वाचन झाले होते, किंबहुना तोपर्यंत काव्यसंग्रह व महाराष्ट्र कवि यांमध्ये प्रसिद्ध झालेले ग्रंथ चाळलेले होते व कांहीं ग्रंथ चांगलेच वाचले होते. हिंदुस्थान सोडल्यानंतर पुढे फारसें वाचन झालें नाहीं. ज्ञानकोश चालू असतां पुन्हा एकदां दीड-दोन महिने स्थूल अवलोकन व मधून मधून वाचन झालें. तथापि नुकतें दुसऱ्या एका कारणाने वाचन झालें. ज्ञानकोश आटपल्यानंतर छापखाना आणि संपादकवर्ग गुंतवून ठेवण्यासाठीं जीं कांहीं कार्ये योजिलीं व आरंभिलीं त्यांतच 'नत्रसंहिता' म्हणून एक ग्रंथ करावा हा एक विचार ठरला. या संकल्पाचें स्वरूप येणेप्रमाणे आहे: वेदका - लापासून चालू काळापर्यंतच्या वाङ्मयांत माझ्या दृष्टीने मला जो अत्यंत उपयोगी, आकर्षक किंवा उच्च प्रकारचा, सामाजिक आणि धर्मशास्त्रीय भाग दिसून आला त्याची संहिता करावी आणि धार्मिक भावनांच्या उत्कटतेमुळे आकर्षक झालेलें असे वाङ्मय एके ठिकाणीं द्यावें या हेतूच्या सिध्दयर्थ कांही निरीक्षण पुन्हां झालें. संस्कृत ग्रंथ बाचले होते; पण मराठी ग्रंथ काळजीपूर्वक वाचले नाहींत म्हणून त्यांच्यांतील भाग निवडणें केवळ दुसऱ्या कोणावर न सोपवितां स्वत: तेंहि वाड्मय डोळ्यांखालून पुन्हां घालवावें अशी इच्छा उत्पन्न ( झाली. हे वाचन करताना संतकवींचे ग्रंथ आणि यांवरील अर्वाचीन लेखकांनीं लिहिलेले वर्णना- हें वाचन चालू असतां दुसरी एक गोष्ट झाली. माझ्या कादंबऱ्यांविषयीं जी बरीचशी प्रशंसा- त्मक किंवा निंदात्मक टीका प्रसिद्ध झाली ती - रून मला असे दिसून आले कीं कादंबन्यांतील माझ्या मताने ज्या गोष्टींविषयीं अभिज्ञता वाच- कांत दिसावयास पाहिजे होती त्या गोष्टींसंबंधाने निंदक व मित्र या दोघांतहि चांगली जाणीव दिसली नाहीं. अशा स्थितीत ग्रंथपरीक्षणात्मक तत्त्वांच्या बाबतीत आपणच कांहीं सांगितलें पाहिजे असे वाटूं लागलें. पण तेव्हां असें वाटू लागलें कीं, आपण स्वकीय वैयक्तिक ग्रंथाचे केवळ समर्थन करण्याच्या उद्देशानें ग्रंथ लिहिण्याऐवजीं व्यापक ग्रंथ कां लिहू नये ! तेव्हां जरा व्यापक, तात्त्विक आणि स्वग्रंथनिरपेक्ष असें पुस्तक लिहावें असें मनांत ठरलें आणि त्याची योजना मनांत करतांना इतर लेखांच्या परीक्षणात्मक लेखकांचा आढावा घेण्याचा विचार सुचला. महाराष्ट्रांत विचार कितपत झाला आहे याविषयीं कांहीं आढावा घेऊन नंतर आपणांस काव्यरसज्ञतेविषयी:: काय सांगावयाचे असेल ते सांगावें असे वाटले. आणि विविधज्ञानविस्तारीच्या पहिल्या वर्षापासून कांहीं दुर्मिळ अंक मिळाले नाहीत ) बहुतेक पुस्तकपरीक्षणे वाचून टोकली. तेव्हा अ दिसून आले की, काव्यपरीक्षणात्मक बहुतेक गोर