पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण प्रत्यक्ष देवाने जरी दिला तरी गुरु हा केलाच पाहिजे इत्यादेि मतें शिवलीलामृतांत मांडली आहेत त्याचा मूळ ग्रंथांत पत्ता नाहीं. हे दोन्हीहि फरक समानस्थितिदर्शक आहेत. याप्रमाणें दुसरे फरक काढतां येतील. ते फरक करण्यांत कवीचा उद्देश काय होता; या तन्हेची चौकशी सुरू झाली म्हणजे त्या काळच्या बौद्धिक परिस्थिती- वर प्रकाश पडेल; आणि असें अनेक कवींचें अध्ययन झालें म्हणजे ज्ञानेश्वराच्या कालापासून आतांपर्यंतचा वैचारिक इतिहास चांगल्या तऱ्हेनें लिहितां येईल. ही अभ्यासाची दिशा उपेक्षणीय नाहीं, आणि मराठी वाङ्मयाचा अभ्यास सुरू करू इच्छिणान्यांनी या दिशेनें अभ्यास करण्यास सुरुवात करावी असे आम्ही सुचवितों. भाषांतरांच्या तौलनिक अभ्यासाने कविका - लीन सामाजिक स्थितीवर जास्त प्रकाश पडणार आहे तसाच कवीच्या मूळग्रंथविषयक कल्पनेवरहि प्रकाश पडणार आहे. मराठी कवींनीं भाषांतरासाठी कोणी संस्कृत ग्रंथ घेतले हैं पहातां असें दिसेल की, त्यांनीं रामायण, महाभारत, भागवत या तीन ग्रंथांवर विशेष भर दिला आहे. कालिदासाच्या रघुवंश, कुमारसंभव आणि मेघदूत या काव्यांकडे त्यांनी लक्ष दिलें नाहीं आणि यास कारणेंहि आहेत. एक तर माहितीच्या दृष्टीने हे दुय्यम प्रकारचे ग्रंथ आहेत. रघुवंशांत जें रामचरित्र आहे त्या चरित्राची रामविषयक सत्यासंबंधाने काय किंमत आहे अशी शंका त्यांस वाटणे स्वाभाविक आहे. याशिवाय भाषांतरकारांची काव्यदृष्टि संतकवीं- मध्ये वागत असलेलीच होती. तीमुळे कोटिक्रम आणि खल करणारे वाङ्मय त्यांनां रुचलें नाहीं. त्या दृष्टीचें साहित्यशास्त्रसमर्थन जरी रामदासांनी केलें आहे तरी त्या दृष्टीची परंपरा मुक्तेश्वरपूर्व कालापासून श्रीधरापर्यंत अव्याहत होती यांत शंका नाहीं. मुक्तेश्वर हा एकनाथाचा नातु व ७६ त्याला जरी वारकरी मंडळींत निश्चयाने घालतां येणार नाहीं तरी त्याची एकंदर काव्य विषयक दृष्टि एकनाथीय भावनांनी तयार झाली यांत शंका नाहीं. भाषांतर करणाऱ्या सर्व मराठी कवींची काव्यविषयक वृत्ति याचें प्रस्तुत ठिकाणी विवेचन शक्य नाहीं. कारण तो फारच मोठा अभ्यास होईल. तथापि याविषयीं जी चर्चा अर्वाचीन लेख- कांनी केली आहे तिच्याकडे थोडेसें लक्ष ओढतो. महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण हा प्रकृत विषय आहे. महाराष्ट्रीय काव्याचें परीक्षण हा नाहीं, आणि यासाठी महाराष्ट्रीयांनी जेथे जेथे स्वभाषें- तील किंवा अन्य भाषेंतील काव्याचे परीक्षण केलें असेल तेथें तेथें व्यक्त केलेले विचार आप- णांस येथे संग्राह्य आहेत. तथापि अनेक प्रसंगी मनुष्य प्रत्येक विचार शब्द नीं व्यक्त करीत नाहीं TM तर आपल्या कृतीनें आपले विचार व्यक्त करीत असतो. मागें जें प्रकरण लिहिले आहे त्यांत महा- राष्ट्रीय कवींनी आदरव्यक्ति भाषांतर व अनुक- रण इत्यादि निरनिराळ्या तन्हांनी व्यक्त केलेली. अभिप्रायदर्शनपद्धति समाविष्ट केली आहे. मराठी कवींनी ज्या कवितेविषयीं विचार व्यक्त केले आहेत त्यांत त्यांनी संस्कृत कवींच्या कृतीं- विषयी किंबहुना कृतींच्या अंगांविषयीं जे विचार व्यक्त केले आहेत ते महत्त्वाचे आहेत. भाषांतरांची परंपरा मुक्तेश्वराच्या अगोदरच्या कालापासून सुरू होते, व मुक्तेश्वर आपणापेक्षां जुन्या कवींच्या भाषांतरांवर टीका करतांना आप- णांस दिसतो हें मागें दाखविलें आहेच. भाषांतरकारांविषयीं प्रथम हें सांगितलें पाहिजे की, त्यांनी आधारग्रंथ एकच धरला नसतो. संस्कृतमधील एका विषयावरील एकच ग्रंथ घेऊन त्याची प्रतिकृति करावी ही कल्पना मुक्ते- श्वरास रुचली नाहीं. त्याने रामायण लिहितांना वाल्मिकि रामायण किंवा अध्यात्म रामायण यांची