पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १३ वै. भाषांतरकार आणि त्यांचें मूळपरीक्षण भाषांतरकार हा आपलें काम करीत असतां कांहीं तरी चिकित्सातत्त्वे वापरीत असतो. तो जेव्हां भाषांतरासाठीं विवक्षित ग्रंथ घेतो तेव्हां तो आपली निवड करण्याची शक्ति उपयोगांत आणतो. व नंतर भाषांतरास घेतलेल्या काव्यां- पैकीं कांही भाग भाषांतर करतो आणि कांहीं भाग सोडून देतो तेव्हां तो आपलें परक्षिण व्यक्त करीत असतो. केवळ पुस्तक वाचून बरें वाईट मत व्यक्त करणें निराळे आणि मूळ कवीचे ग्रंथ घेऊन त्यांतील कोणता भाग लोकांच्या पुढें मांडणे अवश्य आहे हें ठरविणें निराळें. पहिल्या कृतींत परक्षिण होतें तें लेखकाच्या तात्कालिक भावनांप्रमाणे व्यक्त होते. दुसन्या प्रसंगी जें परीक्षण होतें त्यांत अधिक सहृदयता बाळगून त्याच्या काव्यांतील ग्राह्य भागाची निवडानिवड केलेली असते आणि या दृष्टीनें भाषांतरकाराचे भाषांतर अभ्यासयोग्य आहे. जुने कवी घेऊन त्यांच्या मूळ ग्रंथांची भाषांतराशी तुलना करून काय फरक दिसतास ते नोंदून ठेवणें आणि ते फरक कां झाले यासंबंधाचा विचार करणें या तन्हेनें भाषांतरकारांच्या कृतींचा अभ्यास फारसा झाला नाहीं. काव्यसंग्रहकारांनी मोरोपंताच्या कांहीं भागाचा जो अभ्यास केला त्याचें स्वरूप पुढे दाखविलेच आहे. त्या अभ्यासदिशकेडे लक्ष ओढण्यासाठी मी मागें एकदां जें लिहिलें आहे त्याचें अवतरण येथे करतो. मराठी ग्रंथसमूह प्रचंड आहे, आणि त्याचा ऐतिहासिक अभ्यास झाला पाहिजे. या ऐतिहा- सिक अभ्यासाची अनेक स्वरूपे आहेत. जो काळ फार जुना आहे त्या काळच्या सामा- जिक स्थितीची माहिती मिळविण्यास कांहीं कबी उपयोगी पडतील. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वरीवरून ७५ भाषांतरकार आणि त्यांचे मूळपरीक्षण महाराष्ट्राची सामाजिक स्थिति काढतां येईल. व तसा प्रयत्न झालेलाहि आहे. पण जे कवी केवळ भाषांतरवजा काव्यें लिहितात. त्यांच्या काव्यग्रंथांचा अभ्यास कशा- साठी करावयाचा हा एक प्रश्न आहे. सकृत् दर्शनी असे वाटेल कीं, या अभ्यासाचें महत्त्वत्वच नाहीं. कारण आपण ग्रंथ मूळांतूनच पहावे म्हणजे झाले. शिवाय श्लोकबद्ध भाषांतराची आज किंमत काय? मोरोपंताचें भाषांतर वाचा- वयाचें आणि दुर्बोध आर्याचा अर्थ लावीत बसा वयाचें ही तालीम कशासाठी? मूळ महाभारत जर आज गद्यांत भाषांतरले गेलें आहे तर तेंच आपण कां वाचूं नये! अर्थात हें म्हणणें अगदीं सयु- क्तिक आहे. महाभारताची कथा परिचित करून घेण्याच्या दृष्टीनें मुक्तेश्वर, मोरोपंत यांची किंमत फार अल्प आहे. या काव्यवाङ्मयाचा उपयोग सामान्य जनतेस खरोखरच फार कमी होत जाणार. ज्याप्रमाणें एखादी नवी आवृत्ति निघाली म्हणजे जुनी आवृत्ति मागे पडते त्याप्रमाणेच या भाषां- तरांची कथा आहे. संशोधकांखेरीज इतरांस या वाङ्मयाचा उपयोग फार अल्प आहे. तथापि संशोधकांनी मात्र यावर परिश्रम कर- ण्याजोगे आहे. उदाहरणार्थ, शिवलीलामृत घेतलें. हैं पुस्तक ब्रह्मोत्तरखंडाचें रूपांतर आहे असें श्रीधर प्रत्येक अध्यायाच्या शेवटीं बजावतो. पण आपण शिवलीलामृत आणि ब्रह्मोत्तरखंड ही दोन पुस्तकें ताडून पाहिली तर आपणांस दोहोंमध्ये बराच फरक आढळून येतो. बऱ्याचशा कथा त्यांत सदृश आहेत, अनुक्रम भिन्न आहेत, यांसारख्या स्थूल गोष्टी जर सोडून दिल्या तरी देखील लक्ष ओढणारे दुसरे अनेक फरक आढळून येतात. उदाहरणार्थ, शिवलीलामृतांत हरिहरांचा अभेद आहे असें मत वारंवार आणि आग्रहाने मांड - ण्यांत आलें आहे, असला आग्रह ब्रह्मोत्तरखंडांत नाहीं. त्याप्रमाणे मंत्र गुरूपासून घ्यावा. मंत्र