पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण अभंग व ओव्या यांचीच रचना चालू होती असे नाही तर पढ़ें सुद्धां चालू होतीं. तीं पदें अनेक प्रकारची दिसतात; व ज्याअर्थी त्या काळी संगीत रत्नकार हा ग्रंथ झाला त्याअर्थी पदांचे पुष्क- ळच प्रकार उपलब्ध असले पाहिजेत. व हींच पदें अनेक भिन्न चालींवर म्हटली जात असतील पदांचे छंदःशास्त्र करण्याचा प्रयत्न सध्यां जो रा. पटव- धन यांनी केला त्याच्या पूर्वी तो झालाच नाहीं असे म्हटले तरी चालेल. निरंजन माधवान संस्कृत वृत्तांकडेसच लक्ष दिले आहे. छदंःशास्त्रावर मराठींत ग्रंथ झाले. निरंजन माधवाचा ग्रंथ भावे यांनीं महाराष्ट्र कवींत प्रसिद्ध केला आहे (ग्रंथांक १४). या ग्रंथांत २६ वृत्तांचेच विवेचन आहे. मराठी वृत्ते अगदीच उपेक्षिलीं आहेत व संस्कृतमधील देखील मात्रागणवृत्त उपे- क्षिली आहेत. मराठी कविता पदांमध्ये ज्ञानेश्वर कालापासून आजपर्यंत एकसारखी चालूच आहे. आणि जे वाङ्मयं गाण्याकडे उपयोगिलें जावें असे ज्ञाने श्वरादिकांस वाटलें तें त्यांनी पदांत रचले आहे. येथे प्रश्न असा उत्पन्न होतो कीं, संस्कृत अक्षर- गणवृत्तांचा स्वीकार न करण्यांत त्यांची कांहीं काव्यपरीक्षणवृत्ति दिसत आहे काय? मला वाटते की दिसत आहे. कवितेच्या उत्कर्षासाठी कवितेचें वृत्त सोपे असले पाहिजे. नाहीं तर वृत्तासाठी रसाप- कर्ष होतो ही भावना पुष्कळच कवीनां होती व मराठी कवितेत सौकर्याकडे लक्ष ठेवावें असा रामदासापूर्वीपासून उपदेश होता आणि छंद:- शास्त्रावर लोकांनां बांधून टाकणारे ग्रंथ झाले नाहींत ही आनंदाचीच गोष्ट म्हटली पाहिजे. जर ग्रंथरचना सुरू झाली असती तर कालांतराने पदांचे स्वरूप जाऊन त्यांची अक्षरगणवृत्तें देखील बनली असती. संस्कृत छंदःशास्त्र आपल्या भाषेस लागू कर - तांना काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत याची जाणीव देखील मराठी कवींस झालेली आहे. ७४ मराठी भाषेत जी बोलण्याची प्रद्धति आहे तिला संस्कृत भाषेचे सर्व नियम लागू पडत नाहींत म्हणून मराठी कवींनीं संस्कृत छंदः शास्त्रापासून आपले संरक्षण करण्यासाठी आपली लेखणी फिर- विली आहे. परशुरामकवीनें गुरुचरित्राचें जें आर्याबद्ध रूपांतर केलें त्यांत त्याने मराठी छंद:शास्त्राच्या स्वातंत्र्यार्थ एक गोष्ट पुढे मांडली ती ही की, "पुढे अनुस्वार विसर्ग येतो । संयोग स्वास गुरुत्व देतो ।” हा वृत्तदर्पणी नियम नेहेमीच लागू पडेलसें नाहीं. पुष्कळदां पुढील अक्षर जोडाक्षर असूनहि पूर्वीच्या अक्षरास गुरुत्व देत नाहीं. परशुराम ग्रंथारंभी म्हणतो- “गणमात्रा भेद असे आर्याछंदासि जाणती ज्ञाते । आतां भाषायोगे त्याग गुरुत्वास होत संज्ञा ते ॥ जोडाक्षर क्याख्यादि व्या ह्या पर्यंत अक्षराप्राग्जें अक्षरगुरु होतें परि तें लघु भाषापरवि हो साजे ॥ आणिक हि त्ये, म्ह न्हा, व्हा, व्हें, म्हा, म्ही, आदिचें लघुच राही । फोड करीन तयांची सादरता देऊनी मनि धरा ही। इतक्या सख्या उभ्या हो ! न घ्याच चिमट्या मिठ्या कुडयाचि नव्हा । सुगुढ्या उण्या पित्याच्या कुरध्यापरि असुन द्या न सुन्या वृत्ति तथ्यांच्या सुध्या चिप व्हा ॥ सकण्यांच्या हृद्द्छिव्या उभ्या धि नव्या | सदम्या पुन्या भल्यांनी दह्यासि भक्षू न ये हृदय खत व्या ॥ कृष्णेंत न्हा नव्हेचि तुम्हांसि यमभय नांदालचि म्हणत्यें अघ तस्कर तुम्ही सुखें स्वर्गी शिर उडवुनी सुस्कृत स्वर्गी" परशुराम कवींच्या प्रस्तुत आर्याकडे माझे लक्ष ओढण्याचें श्रेय, मुंबईचे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे एक उत्पादक रा. नारायण महादेव ब्राक्रे यांच्या- कडे आहे.