पान:महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शिवराम यांसारखे शिष्य सर्वत्र संचार करून आपल्या समर्थ स्वामींची सेवा योग्यपणे बजावीत ते निराळेच.... कर्नाटक, तंजावर वगैरे प्रांतांत तर ही परंपरा फारच फैलावली होती. आपल्या भाषेतले रघुनाथ, आनंदतनय, गोसावीनंदन, माधव वगैरे अनेक चांगले कवी या तंजावरा - कडील रामदासी परंपरेतलेच आहेत. शिवाजीच्या अगोदरच बखरी तयार होण्यास सुरवात झाली होती, तलिकोटच्या म्हणजे राक्षस तागडीच्या लढाईची बखर अशाचपैकी आहे; ही शिवकालापूर्वीची स्पष्ट दिसत आहे कांहीं बखरी शिवाजीच्यावेळी तयार झाल्या असल्या पाहिजेत. आपणांस त्या उलब्ध नाहीत एवढेच. सभासद बखर शिवाजीच्या काळानंतरची आहे. "हल्ली ज्या बखरी प्रसिद्ध आहेत त्या सर्वांत ९० किंवा ९५ कलमी बखर ही फार जुनी आहे ही प्रथम अरुणोदय वर्तमानपत्रांत व नंतर "भारत वर्षो" त छापली गेली आहे. ही फार महत्त्वाची असून हिच्यानंतरच्या अनेक शिवचरित्रकारांनी हिचाच उपयोग केला आहे. हिची भाषा जुनी असून हिच्या शेवटीं पुढील शेरा आहे : सदरहू आख्यान नव्वद प्रकरणे पुण्यश्लोक राजा त्याची कथा दत्ताजीपंत वांकेनवीस ह्यांपासीं तपशीलवार लिहिली होती. त्यांपासून संकलित तालीक लेहून घेतली. अन्ाजी रंगनाथ मलकरे यांनी हस्ताक्षरें तालिक लिहिली असे.(भावे)" या उताऱ्यावरून याच्या पूर्वीची बखर होती हैं उघड आहे आणि बखर कदाचित शिवकाली देखील लिहिली जाऊन शिवाजीच्या मृत्यूनंतर पुरी करण्यांत आली असावी. शिवाजीच्या काळच्या कांहीं बखरी स्काट वेोरिंगला सांपडल्या होत्या त्या त्याच्या इति- हासांतील टीपांच्या भागांत त्याने उल्लेखिलेल्या आहेत, पण त्यांचा आज पत्ता नाहीं. त्या बखरी- वरून कांहीं तरी निराळी माहिती सांपडेल असा अजमास आहे. चार बखरी शिवाजीस सोयरा- ७३ गीर्वाण वाङ्मयशास्त्र व मराठी ग्रंथकार बाईनें विषप्रयोग केला असें लिहितात म्हणून स्काट वेरिंग सांगतो. तें खरें असल्यास संभा- जीच्या सावत्र आईस क्रूरपणाने मारण्याचे काम जितकें गर्ह्य दिसते तितकें दिसणार नाहीं. उलट त्याने न्यायच केला असें वाटेल संभाजीनें भावास ठार मारलें नाहीं, त्याच्या आईस ठार मारलें हें लक्षांत घेण्याजोगे आहे. जर ती माहिती अजीबात खोटीच असेल तर मात्र ह्या बखरी संभाजीचे केवळ समर्थन करण्यासाठी संभाजीनें लिहविहया अस्तील अशी कल्पना करतां येण्याजोगी आहे. येथे या वादाच्या प्रश्नांत शिरतां येत नाहीं, शिवकालीं कांहीं बखरी तयार होऊन त्यांचा आपणांस अजून पत्ता लागला नाहीं हें शक्य आहे हे दाखविण्यासाठी केलेलें विवेचन पुरे आहे. प्रकरण १२ व. गीर्वाण वाङ्ायशास्त्रे व मराठी ग्रंथकार महाराष्ट्रीयांनी मराठीत कृति करतांना किंवा संस्कृत मधील विद्याग्रहण करतांना आपली गरज व अभिरुचि या दोन दृष्टीनीं ते जुन्या विद्येतील ग्राह्य भागाची निवड करीत होते. संस्कृतमधील विद्या त्यांनी जशीच्या तशीच घेतली नाहीं. भाषातरे केवळ भाषांतर जसे यातच करावयाचे म्हणून केली नाहीत. आपणास काय हवे यासंबंधाची त्यांची अभिरुचि स्वतंत्र होती. व तीमुळे त्यांनी भाषांतरासाठी घेतलेल्या ग्रंथांचे भाषांतर करतांना हवे ते फेरफार केले. तसेच छंद : शास्त्र उपयोगि- तांना त्यांनी हवे तेवढेच निवडले. त्यांनी तें प्रथम घेतलेच नाहीं. बरेचसे वाङ्मय ओव्या व अभंग इत्यादि छंदांत केले. मुक्तेश्वराच्या रामायणापासून अक्षरगणवृत्ते घेण्याचा सपाटा सुरू झाला. आणि तो घेण्याबरोबर संस्कृत छंदः शास्त्रावर देखील भरा- ठींत ग्रंथ करणे भाग पडले. ज्ञानेश्वरापासून केवळ